शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी सुरू करणार पार्सल कुरिअर सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 11:40 IST

Nagpur News, S T आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील बसस्थानकावर आता कोणीही पार्सल कुरिअर घेऊन गेल्यानंतर त्यांचे पार्सल कुरिअर दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्तीला मिळणार आहे.

ठळक मुद्देउत्पन्न वाढविण्यासाठी निर्णयराज्यभरातील बसस्थानकावर मिळणार सुविधा

दयानंद पाईकरावनागपुर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने मालवाहतूक सुरू केली. त्यानंतर आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील बसस्थानकावर आता कोणीही पार्सल कुरिअर घेऊन गेल्यानंतर त्यांचे पार्सल कुरिअर दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्तीला मिळणार आहे.कोरोनामुळे सहा महिने एसटी बसेस ठप्प होत्या. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटीकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत एसटी बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु प्रत्येकाला संपुर्ण ट्रक बुक करणे शक्य नाही. त्यामुळे आता एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने एसटी महामंडळाकडे पार्सल कुरिअर बुक केल्यास लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीला पार्सल कुरिअर मिळणार आहे. एसटीचे संपूर्ण राज्यात नेटवर्क आहे. त्यामुळे पार्सल कुरिअरला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. यात नागरिक एक किलोपासून १ हजार किलोपर्यंतचे पार्सल कुरिअर बुक करू शकतात. पूर्वी एसटी महामंडळाने खासगी कंपनीला हे कंत्राट दिले होते. परंतु आता एसटीने हे काम हाती घेतल्यामुळे महामंडळाचा आर्थिक फायदा होणार असून नागरिकांनाही त्वरित सेवा मिळणार आहे.उत्पन्नासाठी चांगला निर्णयएसटी महामंडळाची आर्थिक स्थिती खराब आहे. महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी चांगले निर्णय घेत आहे. एसटीचे संपूर्ण राज्यात जाळे आहे. त्यामुळे पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पार्सल कुरिअर सेवा सुरु केल्यास एसटीला नक्कीच फायदा होईल.-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

 

 

 

टॅग्स :state transportएसटी