शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अमरावती विभागात ५६ मार्गांवरील एसटी वाहतूक ठप्प

By admin | Updated: July 24, 2014 00:54 IST

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती विभागात जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी एसटी महामंडळालाही पावसाचा फटका बसला. अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडले.

एसटीला फटका : पावसामुळे जनजीवन विस्कळीतअमरावती : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती विभागात जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी एसटी महामंडळालाही पावसाचा फटका बसला. अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडले. काही रस्त्यांवर नदी- नाले तुडूंब भरुन वाहत होते. जीवित हानी होऊ नये म्हणून विभागात ५६ मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील ४०, अकोला- वाशीम १५ व यवतमाळ जिल्ह्यातील एका मार्गाचा समावेश आहे. हे मार्ग बंद करण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा येथे मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. मंगळवारच्या मुसळधार व वादळी पावसाने संपूर्ण विभागालाचा झोडपून काढले. पावसामुळे अनेक मार्गांवरुन नदी-नाले तुडूंब भरुन वाहत होते. अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर मोठे वृक्ष कोसळल्याने काही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून तेथील वाहतूक ठप्प झाली होती. जीवित हानी टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने अमरावती विभागातील ५६ मार्गांवरील एसटी वाहतूक बुधवारी सकाळपासूनच बंद केली होती. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा- वायगाव, दर्यापूर- अकोट, दर्यापूर - भातकुली, अमरावती- शिरजगाव, अमरावती- चांदूरबाजार, चांदूररेल्वे- धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे-तिवसा, चांदूररेल्वे- नांदगाव-भिलटेक, चांदूररेल्वे- गव्हा फरकाळे, चांदूररेल्वे- धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी-पळसखेड, कुऱ्हा- अमरावती, चांदूररेल्वे- आर्वी, वरुड- नागपूर, आर्वी-राजुरा, लोणी- काचुर्णा, वरुड- पांढुर्णा, अमरावती- नागझरी, चांदूरबाजार- अमरावती, चांदूरबाजार- परतवाडा, चांदूरबाजार - देऊरवाडा, चांदूरबाजार- बेलोरा, चांदूरबाजार- आसेगाव, चांदूरबाजार- आसेगाव, चांदूरबाजार -तळेगाव, चांदूरबाजार- ब्राम्हणवाडा, चांदूरबाजार- मोर्शी, मोर्शी- परतवाडा, मोर्शी- तिवसा, मोर्शी- काटोल, मोर्शी- आर्वी, मोर्शी- तिवसा, परतवाडा- चांदूरबाजार, परतवाडा- अकोला, परतवाडा- अमरावती, परतवाडा- धारणी, सेमाडोह, परतवाडा-शिरजगाव, अकोला-वाशिम जिल्ह्यातील अकोला- अकोट, अकोट- परतवाडा, अकोला- मांजोळ वाडेगाव, अकोला- लोगाग्राम, अकोला- नवथळ, अकोला- म्हैसांग, अकोला- गोरेगाव, अकोला- पिंजर, मंगरुळपीर-गोसा पिंपळखुटा, रिसोड- झनक मेहकर, तेल्हारा- जळगाव, मूर्तिजापूर- कामरगाव धनज, मूर्तिजापूर-भातकुली, यवतमाळ जिल्ह्यातील रोळेगाव- नागपूर मार्गांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)