शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतील भाविक महिलेचा नागपुरात  मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:46 IST

भारत दर्शनासाठी आलेल्या श्रीलंकेतील एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या खैरी येथील बुद्धभूमीत घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारत दर्शनासाठी आलेल्या श्रीलंकेतील एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या खैरी येथील बुद्धभूमीत घडली.हेवा वितारणा दयादिलसिया (७४) असे मृत्यू पावलेल्या भाविक महिलेचे नाव आहे. हेवा श्रीलंकेच्या दमपिटिया येथील रहिवासी होत्या. हेवा यांच्यासह श्रीलंकेतील ५४ नागरिक भारतात बौद्ध तीर्थस्थळांची यात्रा करण्यासाठी २४ फेब्रुवारीला भारतात आल्या होते. सर्वजण २४ फेब्रुवारीला चेन्नईला पोहोचले. तेथून बौद्ध गया, सांचीसह अनेक ठिकाणी जाऊन मंगळवारी नागपुरात पोहोचले. या नागरिकांना ड्रॅगन पॅलेसला भेट द्यायची होती. त्यामुळे ते मंगळवारी सायंकाळी खैरीच्या बुद्धभूमीत थांबले. बुधवारी सकाळी ९ वाजता हेवा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्वरीत कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नवी कामठी पोलिसांना सूचना देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना श्रीलंकेच्या भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब लक्षात घेता पोलिसांनीही याची त्वरीत दखल घेतली. ठाणेदार संतोष बकाल आपल्या पथकासह तेथे पोहोचले. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती दिली. हेवा यांच्यासोबत आलेल्या ५३ भाविकांची तब्येत ठीक आहे. कोणालाच ताप, खोकला किंवा सर्दी झाली नाही. कोरोनामुळे सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेवा यांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याची माहिती आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी श्रीलंकेतच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे गुरुवारी शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह श्रीलंकेला रवाना करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाWomenमहिलाDeathमृत्यू