शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सेटिंगच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबादच्या स्क्वॅश स्पर्धेचा रेकॉर्ड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:18 IST

‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश पीडित खेळाडूला मिळू शकते भरपाई

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली.राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार हा रेकॉर्ड सादर केला होता. स्पर्धेत सहभागी खेळाडू आरब जांभुळकरचे वडील अशोक जांभुळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्पर्धेत ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप केला आहे. स्पर्धेत पहिल्या चार विजेत्यांसाठी सामने खेळविण्यात आले, पण औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक आर. डी. महादवाड यांचा मुलगा रितेश महादवाड याला सामना न खेळविताच पाचवा विजेता ठरविण्यात आले. आरबने पाचवा विजेता ठरविण्यासाठी सामना खेळविण्याची विनंती आयोजकांना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.याचिकाकर्त्याने स्पर्धेतील सामन्यांच्या रचनेवरही आक्षेप घेतला आहे. विशिष्ट खेळाडूला कसा लाभ होईल याचा विचार करून सामने निश्चित करण्यात आले, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे.राज्यस्तरीय स्पर्धेतील पहिल्या पाच खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळणार होता. या वादामुळे न्यायालयाने रितेशला राष्ट्रीय स्पर्धेत खेळविण्यास मनाई केली आहे. तसेच, स्पर्धा मंगळवारपासून सुरू झाल्याने व या प्रकरणावर निर्णय झाला नसल्यामुळे आरबचीही संधी हुकली आहे. परंतु, स्पर्धेतील ‘सेटिंग’ सिद्ध झाल्यास आरबला भरपाई मिळवून देण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणावर आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. जे. एम. गांधी तर शासनातर्फे अ‍ॅड. नितीन रोडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Sportsक्रीडा