लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व दहा झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी संबंधितांना दिले.आयुक्तांच्या आदेशाननुसार सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन अग्निशमन वाहनामध्ये भरून ते फवारले जात आहे. शहराच्या दहाही झोनमध्ये एकाच वेळी रात्री ९.३० च्या सुमारास फवारणीला सुरुवात करण्यात आली. सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना पहिल्या टप्प्यातील फवारणीचा परिसर निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार लक्ष्मीनगर झोनमधील गुलमोहर लॉन परिसरातून फवारणीला सुरुवात करण्यात आली तर हनुमाननगर झोन क्षेत्रातील रिंगरोड परिसरातून या फवारणीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.विशेष करुन ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण मिळाले आहेत अशा परिसरात सर्व भागात फवारणी करण्याचे, निर्देश आयुक्तांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना दिले आहे. त्यानुसार तातडीने फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.लक्ष्मीनगर झोनवर विशेष लक्षकोरोना रुग्ण आढळून आलेल्या लक्ष्मीनगर झोनकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. फवारणीसाठी प्रत्येक झोनमध्ये अग्निशमन विभागाच्या एका गाडीचा यासाठी वापर केला जात आहे.परंतु लक्ष्मीनगर झोनमध्ये फवारणीसाठी दोन गाड्या लावण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरात निर्जंतुकीकरण फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:12 IST
नागपूर महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सर्व दहा झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी संबंधितांना दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरात निर्जंतुकीकरण फवारणी
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश :निर्जंतुकीकरणसाठी सोडियम हायपोक्लोराईडचा वापर