शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘वेव्हस्’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: September 26, 2014 01:17 IST

विणकरांना प्रोत्साहन देऊन हातमागाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सेलिब्रेशन सेंटरमध्ये २५ ते २९ सप्टेबर दरम्यान ‘वेव्हस्’

विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण हातमागाची शृंखलानागपूर : विणकरांना प्रोत्साहन देऊन हातमागाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्स लिमिटेडतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सेलिब्रेशन सेंटरमध्ये २५ ते २९ सप्टेबर दरम्यान ‘वेव्हस्’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे आयोजक सर्वेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रदर्शनात एकूण ५७ स्टॉल्स असून यात विणकरांनी तयार केलेल्या कॉटन आणि सिल्क साड्या, फॅब्रिक्स, स्टोल्स, दुपट्टा, होम फनिर्शिंग उपलब्ध आहे. भारतीय हातचरखा आपल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. प्रदर्शनात आंध्र प्रदेशातील गुणवत्तापूर्ण साड्या आणि ड्रेस मटेरियल, वेंकटगिरी, धर्मावरम, उप्पाडाचे रेशम आणि कापसाच्या साड्या, तेलंगणा ते गढवाल, कोत्तकोट, पोचमपल्ली येथील कॉटन आणि सिल्क साड्या, छत्तीसगडचे कोसाचे कापड, गुजरातचे वनस्पती रंग आणि प्रसिद्ध कच्छ कढाई, जम्मू-काश्मीरचे प्रिंटेड शुद्ध रेशम, बारीक कपडा आणि जाळ्याच्या साड्या, नाजूक हस्त एम्ब्रॉयडरी, पश्मिना शाल, कर्नाटकच्या बॉर्डरच्या रेशमाच्या साड्या, महाराष्ट्रातील पैठणी, पश्चिम बंगालच्या काथा वर्क साड्या, परंपरागत मलबरी आणि तस्सर, इरी, मुगा यासारख्या वन रेशमाचा उपयोग करून तयार केलेल्या साड्यांचा संग्रह प्रदर्शनात आहे. याशिवाय खादी सिल्क, बेडशीट, ड्रेस मटेरियल, कश्मिरी टॉप, कुर्ती, कुर्ता उपलब्ध आहे. ग्राहकांना होलसेल दरात कपडे खरेदी करण्याची संधी आहे. विणकर समाज बिकट अवस्थेतून वाटचाल करीत असून या कलेचे संवर्धन करण्यासाठी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान खुले असणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)