मनपा आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमिटेड आणि ऑरेंज ओडिसीच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी हेरिटेज सायकल ट्रेलचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सायकल ट्रेलला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. सायकल ट्रेलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या इंडिया सायकल फाॅर चेंज चॅलेंज स्मार्ट सिटीज मिशन, विविध उपक्रमांतर्गत हेरिटेज सायकल ट्रेल आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राधाकृष्णन बी. म्हणाले, नागपूर फार जुने शहर आहे. इथे हेरिटेजचे चांगले साईट आहे. याचे उद्दिष्ट नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रवृत्त करणे हा आहे.
सिव्हिल लाईन्सच्या हेरिटेज इमारतीबाबत माहिती देणे आणि त्याचे संरक्षण करणे आहे. मनपाचे कर्मचारी दर महिन्याला एक दिवस सायकलने येतात. सायकलिंग आरोग्यासाठी उत्तम आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी सायकलचा वापर करावा, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी केले. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांचा मार्गदर्शनात सायकल ट्रेलचे सफल आयोजन करण्यात आले होते.
सायकल ट्रेल मनपा कार्यालयापासून सुरू होऊन नासुप्र कार्यालय, कस्तूरचंद पार्क, सीताबर्डी किल्ला, आदिवासी गोवारी शहीद स्मारक, मध्यवर्ती संग्राहलय, मीठा नीम बाबा दरगाह, विधानभवन, आकाशवाणी भवन, उच्च न्यायालय येथे समाप्त झाली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आर्किटेक्ट अमोल वंजारी यांनी माहिती सादर केली.
या सायकल ट्रेलमध्ये नगरसेविका परिणीता फुके, उपायुक्त आणि स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर, पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक (प्र.) डॉ. परिणीता उमरेडकर, ई-गव्हर्नन्सचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे, अमित शिरपूरकर, डॉ. पराग अरमल, डॉ. मानस बागडे, डॉ. अमित समर्थ, ऑरेंज ओडिसीच्या मंदिरा नेवारे, शिवानी शर्मा, लहान-लहान मुले-मुली या ट्रेलमध्ये सहभागी झाले.