शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कामशिल्पांचे आध्यात्मिक तत्त्व संशोधनाची गरज : चंद्रकांत चन्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:40 IST

आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. खरंतर मंदिराच्या एकूण शिल्पात ही कामशिल्पे २ किंवा ३ टक्के आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद्भूत मिलाफ या मंदिराच्या कामशिल्पातून होतो. संसारातून वैराग्याकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करताना मधले दैनंदिन कामकर्तव्य महत्त्वाची असतात. मात्र त्यातील कामभावनेकडे अधिक लक्ष देण्यात आले. त्यातील आध्यात्मिक तत्त्व आपल्यापर्यंत पोहचलीच नाही. ती त्या रूपाने संशोधन करून पोहचणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवि.सा.संघातर्फे ‘मंदिरावरील कामशिल्पे’वर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. खरंतर मंदिराच्या एकूण शिल्पात ही कामशिल्पे २ किंवा ३ टक्के आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद्भूत मिलाफ या मंदिराच्या कामशिल्पातून होतो. संसारातून वैराग्याकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करताना मधले दैनंदिन कामकर्तव्य महत्त्वाची असतात. मात्र त्यातील कामभावनेकडे अधिक लक्ष देण्यात आले. त्यातील आध्यात्मिक तत्त्व आपल्यापर्यंत पोहचलीच नाही. ती त्या रूपाने संशोधन करून पोहचणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सर्जना निर्माण या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मंदिरावरील कामशिल्पे’या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी चन्ने यांनी कोणार्क मंदिरावर विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कामशिल्पे असलेली मंदिरे मध्य भारताच्या खाली बनविल्या गेली. कोणार्कच्या सूर्यमंदिराची निर्मिती त्याकाळच्या राजाने केली. त्यातील सूर्यदेवाच्या रथाची चाके, या चक्रातील २४ रेषा, ८ आरे यांना गहन अर्थ आहे. त्याच्यामध्ये कामशिल्पे कोरली आहेत. यात शयनाची वेगवेगळी आसने आहेत. शयन किंवा मिथूनाला वेळेचे बंधन नसते, कुठल्याही मानसिकतेत ते होते, इतर सर्व भेदापेक्षा स्त्री-पुरुष हाच भेद महत्त्वाचा असतो. प्रत्येक शिल्प प्रतिकांच्या रूपात समोर येतात. वात्यायनाच्या कामासनावर आधारित ही शिल्पे अद्भूत सौंदर्याने व त्यामागील अर्थाने भरलेली आहेत. ती संवेदना समजली नाही तर भावनांचा घोळ होतो; म्हणून त्याचा अभ्यास करा, ती संवेदना जपा, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी डॉ. रमा गोळवलकर यांनी खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिराची विशेषता सांगितली. कर्कवृत्ताच्या रेषेवर बांधलेले हे मंदिर ओलांडून सूर्यही जात नाही, यामागील खगोलशास्त्र त्यांनी उलगडून सांगितले. मंदिराचे बांधकाम वेगवेगळ्या स्तरात झाले आहे. कलश, शिखर, मंडोवर किंवा जंघा तसेच अधिष्ठान किंवा जगती असे स्तर आहेत. त्यातील जगती भागावर केवळ ३ टक्के कामशिल्पे आहेत. या कामशिल्पामध्ये संगीत, नाटक, नृत्य, शेतीची कामे व कामक्र ीडेपर्यंतच्या दैनंदिन कामांचे शिल्प कोरलेली आहेत. पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये कामभावनेचाही समावेश आहे. ही कामशिल्पे मंदिराच्या बाह्य भागात जगतीवर केवळ १० ते १२ इंच मोठी आहेत. दैनंदिन कामभावना बाहेर सोडून या कामशिल्पामधील आसक्ती, तन्मयता ईश्वराबद्दल असेल तरच तुम्ही मंदिराच्या आत गाभाºयात प्रवेश करा, असा आध्यात्मिक संदेश या शिल्पांच्या माध्यमातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम माधव धोंड यांनी मंदिरावरील कामशिल्पामधील काव्यभावना उलगडून सांगितली. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ