शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मसाल्याच्या शेतीमुळे पालटू शकते विदर्भातील आर्थिक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:40 IST

Nagpur News शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मसाले शेतीचा विचार करावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ.एम. एन. वेणूगोपाल यांनी केले.

ठळक मुद्देनैसर्गिक शेती लागवडीबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील जमिनीची पोत व हवामान विचारात घेता येथे मसाल्याची शेती खूप चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. मसाल्याच्या ६३ प्रजातींपैकी ५९ प्रजातींचे उत्पादन विदर्भात सहज होऊ शकते. विशेष म्हणजे मसाले शेतीमुळे आर्थिक चित्रही पालटू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मसाले शेतीचा विचार करावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मसाले विभागाचे माजी प्रमुख डॉ.एम. एन. वेणूगोपाल यांनी केले. रामटेक तालुक्यातील छत्रपूर येथे मसाले शेती व नैसर्गिक पद्धतीने शेती लागवड करण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रणजित कांबळे होते. याशिवाय आ. आशिष जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनिता गावंडे, माजी आमदार मुझफ्फर हुसैन हेदेखील उपस्थित होते.

विदर्भात तापमान जास्त असले तरी उन्हाळ्याच्या दिवसात योग्य व्यवस्थापन केले तर मसाले शेतीवर कुठलाही परिणाम होत नाही. पूर्व विदर्भात धानाचे उत्पादन होते. धान शेतीच्या बांधावर दालचिनी, तेजपत्ता, जायफळ, जावित्री ही मसाला पिके सहज घेता येतात. आंबा उत्पादन होणाऱ्या भागात काजूचे पीक घेता येते. खाण्याच्या पानांचे उत्पादन ज्या भागात होते तेथे काळी मिरीचे उत्पादनही भरघोस होते. आंबा, फणस,शेवगा, कटाल यासारख्या झाडांवर काळी मिरीची वेल सहज वाढते, असेही त्यांनी सांगितले. मसाला शेती कशी करायची याचे मॉडेल येथे विकसित केले जाईल व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती मुझफ्फर हुसैन यांनी दिली.

 

टॅग्स :agricultureशेती