शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

एसपीजीने नागपुरात घेतला पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा; कडेकोट बंदोबस्त तैनात

By योगेश पांडे | Updated: March 27, 2025 23:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून, गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

योगेश पांडे - नागपूर  नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने एसपीजीचे पथक नागपुरात दाखल झाले असून, गुरुवारी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत चारही ठिकाणे तसेच दौऱ्याच्या मार्गावरील सुरक्षा बंदोबस्ताबाबत सखोल नियोजन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूरला येत आहेत. सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी, माधव नेत्रालय तसेच अमरावती मार्गावरील सोलार एक्सप्लोझिव्हला भेट देतील.

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजीचे पथक गुरुवारी नागपूरला पोहोचले. डीआयजींच्या नेतृत्वाखालील या पथकाने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पंतप्रधान ज्या ठिकाणी भेट देणार आहेत तेथील पाहणी केली. स्मृती मंदिर, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय हे शहर पोलिसांच्या अखत्यारीत येतात, तर सोलर एक्सप्लोसिव्हचा परिसर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येतो. एसपीजीच्या पथकाने पोलिसांना सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या आहेत.

चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्तनागपुरात मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांसह चार हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यांमधूनही १५० अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

सायबर सेलकडून सोशल माध्यमांवर वॉच१७ मार्च रोजी समाजमाध्यमांवर अनेक आक्षेपार्ह मजकूर, चित्रफिती, छायाचित्रे शेअर झाली व त्यानंतर हिंसाचार-जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सायबर सेलकडून सोशल माध्यमांवर बारीक लक्ष देण्यात येत आहे.