शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ला ‘स्पीड अप’ करा; मुख्यमंत्री, गडकरी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:19 IST

उपराजधानीतील ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देशहरातील विविध विकास कामांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रकल्प जागतिक दर्जाचा करण्याच्या दृष्टीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय प्रक्रियेला वेग आणा व आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना या दोन्ही नेत्यांनी रविवारी केली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’ येथे नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्याची सूचना करण्यात आली.या बैठकीत ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’च्या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प महानगरपालिकेच्या मालकीच्या ३०.४९ हेक्टरवर राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत हॉस्पिटल, मेडिकल हब, सराफा व्यवसाय आदी वाणिज्यिक वापरासोबतच रहिवासी तसेच मनोरंजन आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.या प्रकल्पाला अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याचा आराखडा लवकरात लवकर तयार करावा तसेच या प्रकल्पासाठी महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास व मेट्रो यांची संयुक्त बैठक घेऊन आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प स्वयंपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे. सोबतच एकत्रित प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करुन या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकर कसे करता येईल या दिशेने प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री व गडकरी यांनी केल्या. यावेळी ‘मिहान’ येथील ‘कन्व्हेन्शन सेंटर’, ‘ग्रो व्हिजन कन्व्हेन्शन सेंटर’ यांच्यासह यशवंत स्टेडियम, संत्रा, कॉटन मार्केट तसेच अंबाझरी ओपन थिएटरसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचनादेखील दोन्ही नेत्यांनी केल्या.

‘इलेक्ट्रिक बस’च्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यताबस वाहतूक अत्यंत सुलभ व कमी खर्चात तसेच नागरिकांनाही सुलभपणे प्रवास करता येईल यादृष्टीने ‘इलेक्ट्रिक बस’च्या प्रस्तावास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. ‘ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड’तर्फे या बसचे सादरीकरण करण्यात आले. ‘इलेक्ट्रिक बस’ वातानुकूलित असून भाडेसुद्धा कमी राहणार असल्यामुळे बस चालविण्यासंदर्भात संबंधित कंपनीने सकारात्मक व योग्य दराचा प्रस्ताव सादर केल्यास राज्यात ‘इलेक्ट्रिक बस’ चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

फुटाळ्यासाठी ११२ कोटींचा निधीफुटाळा तलाव परिसराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे तळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. येथे चार ते पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशा प्रकारची ‘लेक व्ह्यू गॅलरी’, ‘शॉपिंग एरिया’, वाहनतळासाठी संपूर्ण व्यवस्था यादृष्टीने नियोजन व्हावे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनातर्फे ११२ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

दहा हजार क्षमतेचे ‘कन्व्हेन्शन सेंटर’‘मिहान’मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक ‘कन्व्हेन्शन सेंटर’ प्रस्तावित असून याची क्षमता दहा हजार व्यक्तींची राहणार आहे. हे ‘सेंटर’ देशविदेशातील उद्योजक, नागरिक, खेळाडू आदींचे आकर्षण ठरेल यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी आवश्यक ते संपूर्ण साहाय्य केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येईल. यासाठी ‘ट्रायकॉन’तर्फे सुंदर व आकर्षक आराखडे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी