शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बायोटॉयलेट प्रकल्पाला मिळणार गती

By admin | Updated: March 7, 2017 02:01 IST

रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली.

मोतीबागेत रेल्वेचा पायलट प्रकल्प : पुढील वर्षी तयार होतील तीन हजार बायोटॉयलेटनागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोतीबाग बायोटॉयलेट प्रकल्पाला गती वाढविण्याचे वेध लागले आहे. यापूर्वीसुद्धा या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची तयारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दाखविली होती. परंतु त्याबाबत पुढे काहीच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे प्रकल्पाची गती वाढणार असून, पुढील वर्षी या प्रकल्पात तीन हजार बायोटॉयलेट तयार करण्यात येणार आहेत. मोतीबागच्या बायोटॉयलेट प्रकल्पात बायोटॉयलेटसाठी लागणाऱ्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती केली जाते. या प्लॅन्टची क्षमता प्रति दिवस ५०० लिटर पाण्याची आहे. २०१४-१५ या वर्षात प्रकल्प सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात २०१५-१६ यावर्षी कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी मोतीबाग प्रकल्पातून ६१० बायोटॉयलेट तयार झाले. मध्य रेल्वेच्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा येथील बायोटॉयलेट लावण्यात आले. तत्पूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतही काही महत्त्वपूर्ण गाड्यात बायोटॉयलेट लावण्यात आले असले तरी त्यांची संख्या अतिशय कमी आहे. भारतीय रेल्वेचा हा देशातील एकमेव पायलट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी दपूम रेल्वे प्रशासनाने आग्रहाची भूमिका घेतली होती. दपूम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्याची तयारी दर्शवून या प्रकल्पातील २५०० बायोटॉयलेट विविध रेल्वे झोनमधील गाड्याात लावले. पुढील वर्षी तीन हजार बायोटॉयलेट निर्मितीचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्यासाठी वर्षाला अडीच लाख बायोटॉयलेटची गरज आहे. या प्रकल्पातून सध्या २५०० बायोटॉयलेटची निर्मिती होत आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उत्पादनक्षमता फारच कमी आहे. त्यामुळे रेल्वे खासगी तत्त्वावर बायोटॉयलेट विकत घेत आहे. मोतीबाग प्रकल्पाची क्षमता वाढल्यास लवकरच देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लागणार आहेत. (प्रतिनिधी)अशी आहे प्रक्रिया प्रकल्पातील साठवणूक केलेल्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती होते. हे पाणी लिटर प्रमाणे मागेल त्या रेल्वेला पाठविले जाते. चौकोनी आकाराच्या डब्यात हे पाणी असलेली टाकी रेल्वेतील शौचालयाखाली लावली जाते. मानवी मलमूत्र या टाकीत साचते. मात्र या टाकीत असलेले इनॉक्युलम बॅक्टेरिया यातील मल नष्ट करून त्याचे पाण्यात रूपांतर करतात. बॅक्टेरियाने तयार केलेल्या पाण्याची पातळी वाढली की ते बाहेर पडत राहते. त्यामुळे टाकीत केवळ पाणीच उरते. बंद डब्यात हे बॅक्टेरिया दोन महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात.