शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणेसाठी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:37 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने आरक्षित सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाड्या, विशेष शुल्कावर अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडीच्या २ फेऱ्या आणि नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडीची एक फेरी सोडण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२७३ लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ११ ऑक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता नागपुरला येईल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२७२ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी ९ ऑक्टोबरला दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ३.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनीला थांबेल. या गाडीत १४ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील. तसेच ०२११५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर स्पेशल रेल्वेगाडी ८ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता अजनी रेल्वेस्थानकावर पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२११६ अजनी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल रेल्वेगाडी अजनीवरून ९ ऑक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि सिंदीला थांबेल. या गाडीता १३ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील. रेल्वेगाडी क्रमांक ०१२७० नागपूर-पुणे स्पेशल रेल्वेगाडी नागपूरवरून ८ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड येथे थांबेल. या गाडीत १३ स्लिपर, ६ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील.

टॅग्स :railwayरेल्वे