शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई, हावडा-अहमदाबादसाठी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 09:52 IST

रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी झाली सुविधानागपूरमार्गे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.रेल्वे बोर्डाने रेल्वे वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. रेल्वेत लॉकडाऊन संपल्यानंतर सुरुवातीला २३० रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. त्यानंतर आता १२ सप्टेंबरपासून ८० रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. ८० वरून ही संंख्या ८६ करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक वाढविण्यासाठी ज्या गाड्या आठवड्यातून एक दिवस धावत होत्या त्या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शनिवारपासून लागू करण्यात आला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलचा समावेश आहे. सोबतच रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा या विशेष रेल्वेगाडीला आता आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी आपल्या नियोजित वेळेनुसार हावडावरून धावणार आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८०९ आता बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी मुंबईवरून धावणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी हावडावरून तर रेल्वेगाडी क्रमांक ०२८३३ शुक्रवार, सोमवार आणि बुधवारी अहमदाबादवरून धावणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या वेळेत कुुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या चारही रेल्वेगाड्या १ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या २३० रेल्वेगाड्यात समाविष्ट होत्या. या गाड्या दररोज धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मागील दोन महिन्यापासून या गाड्या आठवड्यातून एक दिवस चालविण्यात येत होत्या. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे