शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या

By admin | Updated: November 1, 2016 02:41 IST

दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा

नागपूर : दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेटिंगचे तिकीट असलेल्या प्रवाशांना आरामात प्रवास करणे शक्य होणार आहे. अजनी-पुणे रेल्वे प्रशासनाने विशेष शुल्कावर अजनी-पुणे-अजनी सुपरफास्ट वातानुकूलित रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२१२४ अजनी-पुणे सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्ध्याला रात्री ८.५०, धामणगाव ९.३५, बडनेरा १०.३७, अकोला ११.४० आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१२३ पुणे-अजनी सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून १८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ही गाडी धामणगावला दुसऱ्या दिवशी रात्री ३.०२, वर्धा ३.४०, अजनीला पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात एकूण १६ कोच असून त्यात १ फर्स्ट एसी, ४ टु टायर, ९ थ्री टायर आणि २ पॉवर व्हॅन कोच आहेत. दोन्ही गाड्यांचे अरक्षण १७ आॅक्टोबरला सुरू होणार आहे. नागपूर-अमृतसर सुपरफास्ट एसी रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ०२१२५ नागपूर-अमृतसर सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून १२ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.५० वाजता सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अमृतसरला दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१२६ अमृतसर-नागपूर सुपरफास्ट वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी अमृतसरवरून १४ नोव्हेंबरपर्यत प्रत्येक सोमवारी पहाटे ४.२० वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आगरा, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना, जालंधर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ फर्स्ट एसी, २ टु टायर एसी, ९ थ्री टायर एसी कोच आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी) रेल्वेस्थानकावर गर्दी वाढली दिवाळीनिमित्त अनेकांनी प्र्रवासाचा बेत आखल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गर्दी वाढली आहे. मंगळवारी भाऊबीज असल्यामुळे या सणासाठी रेल्वेगाड्यातील गर्दी आणखीनच वाढली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारील आरक्षण कार्यालयात तसेच आरपीएफ शेजारील चालू तिकीट कार्यालयात प्रवाशांच्या तिकीट काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सेकंड क्लास वेटिंग रुम, लेडीज वेटिंग रुम आणि एसी वेटिंग हॉलमध्येही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. कोचमध्ये उभे राहण्यासाठी जागा उरलेली नसल्याने प्रवासी मोठ्या संख्येने कोचच्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवास करताना दिसले. प्रवाशांची ही गर्दी आणखी पाच दिवस अशीच कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.