शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

फेटरी, येरला भागातील वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:38 IST

फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांची माहिती : नागरिकांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली.वन विभागातर्फे गावकऱ्यांची भीती दूर करण्यासाठी येरला ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आली. सभेसाठी येरला, फेटरी, बोरगाव, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा येथील सरपंच, उपसरपंच व गावकरी उपस्थित होते. सभेला उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी मार्गदर्शन केले. या भागात होत असलेल्या पशुधन नुकसानीबाबत काय काळजी घ्यायची, कुठलीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देऊन वन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. वाघावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेटरी गावात विशेष चमू तैनात करण्यात आली असून, ही चमू माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहोचणार आहे. ज्या ठिकाणी जनावरे मारल्या गेली, तेथे मागील पाच दिवसांपासून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले असून, वन विभाग वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे गावकऱ्यांना सभेत सांगण्यात आले. नागरिकांनी शेतात एकटे न जाण्याबाबत ग्रामपंचायततर्फे दवंडी देण्यात आली आहे. कुठलीही मनुष्यहानी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, वन विभागाकडून जनजागृती सुरू आहे. सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे, कळमेश्वरच्या वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग