शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकासासाठी ९५८ कोटींंचा विशेष कार्यक्रम; अनुप कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:34 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विदर्भासाठी ९५८.७८ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे वैधानिक विकास मंडळाची विशेष बैठकनागपूर विभाग ६५५.९५, अमरावती विभागासाठी ३०२.८३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत विदर्भासाठी ९५८.७८ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी ६५५.९५ आणि अमरावती विभागासाठी ३०२.८३ कोटी रुपये असल्याची माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा नागपूर विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह, मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. किशोर मोघे, सदस्य सचिव एन.के.नायक आणि नियोजन उपायुक्त कृष्णा फिरके उपस्थित होते.या विशेष कार्यक्रमात कृषी तसेच कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, व दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, वनाधारित उद्योग, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, दळणवळण, वित्तीय सेवा पर्यटन व सांस्कृतिक कार्य आणि कृषी सिंचन व जलसंधारण तसेच विद्युत विकास आणि मानव संसाधन विकासासाठी ६९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.

नागपूर येथे डिफेन्स आणि एअरोस्पेस क्लस्टरनागपूर येथे ५३ कोटी रुपये किमतीच्या डिफेन्स आणि एअरोस्पेस क्लस्टरची उभारणी करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये संरक्षण संबंधित निर्माण कार्य तसेच एअरोस्पेस सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. नवीन औद्योगिक धोरणामध्ये महाराष्ट्रात संरक्षण आणि एअरोस्पेस क्लस्टर उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे नागपूर येथे पहिल्या टप्प्यात उडाण कौशल्य विकास केंद्र आणि दुसऱ्या टप्प्यात निर्माण सामान्य सुविधा केंद्र याप्रमाणे दोन टप्प्यात हा क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बळकटीकरणअमरावती विभागामध्ये ३०२ कोटी ८३ लक्ष रुपयांच्या निधीमधून शेततळ्यांना अस्तरीकरण करणे, छोटे गोदाम तयार करणे व शेतकऱ्यांना सोलार इलेक्ट्रीक पंप देणे तसेच पर्यटन विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. फळ रोपवाटिकांमध्ये सुधारीत रोपवाटिकांची स्थापना आणि अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात बियाणे हब तयार करण्यात येणार असल्याचे अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.टूल बँकसाठी ६२ कोटीशेतकऱ्यांना उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी टूल बँक तयार ६२ कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार आहे. यात नागपूर विभागात ३२ व अमरावती विभागात ३० कोटी रुपयाचा खर्च होईल. नर्सरी विकासासाठी २५ कोटी रुपये खर्च होतील. गडचिरोलीतील वडसामध्ये दुग्धविकासासाठी अडीच कोटी दिले जातील. मत्स्यबिजेसाठीही तरतूद केली जाईल.

टॅग्स :Vidarbha Development Boardविदर्भ वैधानिक विकास मंडळ