शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
2
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
5
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
6
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
7
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
8
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
9
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
10
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
11
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
12
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
13
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
14
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
15
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
16
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
17
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
18
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
19
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
20
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

शिक्षकांना मतदानासाठी मिळणार जांभळ्या रंगाचा विशेष पेन

By admin | Updated: January 23, 2017 21:14 IST

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदार होणार असून ६ फेब्रुवारीला मतमोजणी

ऑनलाइन लोकमतनागपूर,, दि. 23 -  नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदार होणार असून ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजच्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मततदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाचा शाईचा विशेष पेन पूरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी या विशेष पेनतात उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. अनूप कुमार यांनी सांगितले की, नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी १२४ केंद्र निश्चित करण्यात आले असून यासाठी ६८० अधिकरी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार म्हणून ३४ हजार ९८७ शिक्षकांनी नोंदणी झाली आहे. मतदनासाठी प्रशासनकडून पूरविण्यात येणाऱ्या विशेष पेन त्यांच्याकडून परत घेण्याकरिता एका मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचार संहितेदरम्यान विकास काम, महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीश मोहोड, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपायुक्त पापडकर, तहसीलदार श्रीराम मुंधडा उपस्थित होते.  बावनकुळेंचे वक्तव्य आचार संहितेचा भंग नाहीविधान परिषदेचे आमदार फंड विकतात, असे विधान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केले होते. त्यांचे हे वक्तव्य आचार संहिता भंग नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आचार संहिता भंगाची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.