शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रा.स्व. संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांकरिता खास महाराष्ट्रीयन भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:49 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकासाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे.

ठळक मुद्देताक आणि संत्राबर्फीची विशेष मागणीस्वयंसेवकाच्या सरबराईत भाजयुमोचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकासाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे. सोबतच नाश्त्यात नागपूरची प्रसिद्ध संत्राबर्फी आणि नागपूरच्या उकाड्याची दाहकता जाणवू नये म्हणून ताक स्वयंसेवकांच्या भोजनात आहे. स्वयंसेवकाच्या सरबराईत भाजयुमोचा सक्रिय सहभाग आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेचे संघ वर्तुळात विशेष महत्त्व असते. या प्रतिनिधी सभेत देशभरातून संघ आणि संघप्रणित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतात. यात काही बौद्धिक मार्गदर्शनाबरोबर संघ भविष्यात कुठल्या अजेंड्यावर कार्य करणार आहे, याबाबत पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असते. शुक्रवारपासून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात या प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली आहे. देशभरातून संघाच्या स्वयंसेवकाबरोबरच संघप्रणित संघटनांचे १५३८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांचे हे बौद्धिक व मार्गदर्शनपर सत्रासाठी आलेल्या स्वयंसेवकांच्या राहण्यापासून खाण्यापर्यंत सर्व आयोजन स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. संघाचे स्वयंसेवक विविध प्रांतातील असले तरी, त्यांना महाराष्ट्रीयन भोजनाचाच आस्वाद घ्यावा लागत आहे. सकाळी नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, यासोबतच नागपूरची प्रसिद्ध संत्राबर्फी होती. भोजनामध्येही पत्ताकोबी, वरण व चपाती आणि भात हे पदार्थ होते. त्याचबरोबर ताक स्वयंसेवकासाठी विशेषत्वाने होते. ही प्रतिनिधी सभा संघाच्या स्वयंसेवकांसाठी महत्त्वाची असल्याने, सरसंघचालकांचे मार्गदर्शन आणि भविष्यातील कामाचा अजेंडा ठरविण्यात येत असल्याने, भोजनाचे काही विशेष महत्त्व नसते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघfoodअन्न