शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या तस्करीसाठी बनविला विशेष कोट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 20:10 IST

लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात आला. कोटात दारूच्या ३० बॉटल्स भरून त्यावर शर्ट घातले. परंतु आरपीएफ जवानांची करडी नजर त्याच्यावर गेल्यामुळे त्यास अटक करण्यात आली.

ठळक मुद्देअफलातून  शक्कल : आरपीएफच्या जवानांनी केली मुद्देमालासह अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न समारंभासाठी अनेकजण दुकानातून रेडिमेड कोट विकत घेतात किंवा टेलरकडून बनवून घेतात. परंतु चंद्रपूरच्या एका युवकाने आपली शक्कल लढवून खास दारूच्या तस्करीसाठी एक कोट तयार करून घेतला. त्यात दारूच्या बॉटल ठेवण्यासाठी ३० कप्पे तयार केले. कोट घेऊन नागपुरात आला. कोटात दारूच्या ३० बॉटल्स भरून त्यावर शर्ट घातले. परंतु आरपीएफ जवानांची करडी नजर त्याच्यावर गेल्यामुळे त्यास अटक करण्यात आली.रत्नाकर टिकाराम नंदनवार (२६) रा. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यप्रकाश सिंह, गोविंद एडले, उषा तिग्गा, रजनलाल गुर्जर, केदार सिंह हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर गस्त घालत होते. त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. तिची तपासणी केली असता शर्टाच्या आतमध्ये खास तयार करून घेतलेल्या कोटाच्या कप्प्यात दारूच्या २८८० रुपये किमतीच्या १८ बॉटल्स ठेवल्या होत्या. लगेच त्यास अटक करून मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. दुसऱ्या घटनेत सायंकाळी ५.१५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या १७४२ रुपये किमतीच्या ६७ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर