शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान

By आनंद डेकाटे | Updated: July 13, 2023 18:23 IST

२६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल

नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जातील.

सन २०२३-२४ मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थी असल्यास त्यांना आरक्षणातंर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांचेकडे प्रवेशापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जेईई, नीट, एमबीए, बीई सेकंट इयर, एम.एड., बी.एड., औषधनिर्माण शास्त्र पदविका व या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे परंतु त्यांनी अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता अर्ज सादर केलेला नाही त्यांनी समितीकडे प्रमाणपत्र मिळणेकरीता सीईटी परीक्षेच्या गुणपत्रिकेसह तत्काळ अर्ज सादर करावा.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील जे विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये प्रवेश घेणार आहे त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे सर्व अर्ज तात्काळ भरून पाठवावे. विद्याथ्र्यांनी अर्ज भरुन सर्व कागदपत्रासह तात्काळ कार्यालयात सादर करावे. इतर जिल्हातील जातीचे प्रमाणपत्र असल्यास संबंधित समितीकडे अर्ज पाठवावे.

- ऑनलाईन अर्ज कराwww.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा व अर्जासोबत सर्व कागदपत्रे राजपत्रित अधिकान्यांकडून साक्षांकीत करुन तसेच ऑनलाईन अपलोड करुन अर्जासोबत सलंग्न करुन सादर करावे. कुठलेही खोटे पुरावे जोडू नये. प्रस्तावासोबत सादर करीत असलेले सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करुन सर्व कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती विलंबाबाबतच्या हमीपत्रासह प्रस्ताव कार्यालयामध्ये त्वरीत सादर करावा.

जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश मिळाला नाही तर त्यास समिती जबाबदार राहणार नाही याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव सादर करताना त्रयस्थ व्यक्तीकडे काम सोपवू नये. स्वतः स्वतःचे प्रस्ताव सादर करावे.

सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकार