शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे गुन्हाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 20:02 IST

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवायरलेस मोबाईलचाही वापर करणे बेकायदेशीर  चार महिन्यात ४३३ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र  मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या चार महिन्यात वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत ४३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.जोपर्यंत वाहन चालविताना लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे लोकांसाठी आणि सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही. कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही, असा निष्कर्षही केरळ उच्च न्यायालयाने मांडला आहे. परंतु तज्ज्ञाच्या मते केरळमध्ये त्या कायद्यात तसे नियम केले नसावे. महाराष्ट्र  मोटार वाहन कायद्यात तशी तरतूद असल्याने तो गुन्हाच ठरतो.असा आहे कायदा‘आरटीओ’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालविताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता मोबाईलच नव्हे, तर वायर अथवा वायरलेस मोबाईलचा वापर करता येत नाही. सिग्नलवर, तसेच रस्त्याच्या कडेला थांबले असतानाही त्याचा वापर करता येत नाही. वाहनावरून उतरून ते रस्त्याच्या कडेला नेऊन नीट उभे करा. उतरा आणि मगच मोबाईल वापरा, असे कायदा सांगतो.२०० रुपये दंडवाहन चालविताना किंवा वाहनावर बसून मोबाईलचा वापर वाढल्याने यावर गंभीर कारवाई केली जात आहे. नियमानुसार २०० रुपये दंड आकारला जातो. मोबाईलचा वापर, तसेच हेल्मेट नसणे, कागदपत्रे नसणे, विमा नसणे, परवाना नसणे, परवाना न बाळगणे, अयोग्य पार्किंग आदींसह मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडाच्या रकमेत वाढ होते. मोटार वाहन कायद्याचे तीन वेळा उल्लंघन केल्यास आर्थिक दंडाबरोबरच परवाना निलंबन करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन खात्याला केली जाते.आरटीओकडून ३० हजार रुपयांची दंडात्मक कारवाईआरटीओ नागपूर शहरने मार्च १७ ते एप्रिल १८ या कालावधीत ६० वाहनचालकांवर कारवाई करून ३० हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. तर वाहतूक शाखा चेंबर २ अंतर्गत जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ४३३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :MobileमोबाइलRto officeआरटीओ ऑफीस