शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

ते चिमुकले पुन्हा ऐकू शकणार आवाज

By सुमेध वाघमार | Updated: July 5, 2024 18:07 IST

मेयोचा पुढाकार : राज्यात पहिल्यांदाच कॉक्लीअर इम्प्लांट दुरुस्ती

सुमेध वाघमारे नागपूर : जन्मजात श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांसाठी कॉक्लअीर इम्प्लांट नि:शुल्क उपलब्ध करून दिले जात असलेतरी ते नादुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. परिणामी, अनेकांना पुन्हा बहिरेपणाला सामोर जावे लागायचे. याची दखल मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी घेतली. त्यांनी पाठविलेल्या यंत्र दुरुस्तीचा प्रस्तावाला नुकतीच शासनाने मंजुरी दिली. यामुळे हे रुग्ण पुन्हा आवाज ऐकू शकणार आहेत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.      

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी आतापर्यंत १०१ कॉक्लीअर इम्प्लांट केले. मेडिकलमध्येही १००वर याच्या शस्त्रक्रिया झाल्या. मेयोमध्ये २०१७पासून या शस्त्रक्रिया सुरू आहेत. हे यंत्र महागडे असल्याने शासन गरजू रुग्णांना नि:शुल्क उपलब्ध करून देते. पाच वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये या यंत्राचे रोपण केले जाते. परंतु खेळताना किंवा एखाद्या घटनेमुळे यंत्र नादुरुस्त होत असल्याने या चिमुकल्यांना पुन्हा बिहरेपणाला सामोर जावे लागत होते. यंत्राचा दुरुस्तीचा खर्चही सामान्यांना परडवणारा नाही. काही त्रस्त पालकांनी मेयो प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. चव्हाण घेऊन प्रस्ताव तयार केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून त्यांनी या विषयीची माहिती दिली. त्यांनी लागलीच निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी खनीकर्म विभागातून १५ लाखांचा निधी मंजुर केला. यामुळे लवकरच नादुरुस्त कॉक्लीअर इम्प्लांट दुरूस्त होऊन चिमुकल्यांचे आयुष्य सुकर होणार आहे. 

गरजूंनी समितीकडे द्यावा प्रस्तावयंत्र दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शिंदे, इएनटी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी, सहयोगी प्राध्यापक डॉ. विपीन इखार व आॅडीओलॉजिस्ट डॉ. मृगा वैद्य यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ज्या रुग्णांचे कॉक्लीअर इम्प्लांट नादुरुस्त आहे त्यांनी या समितीकडे दुरुस्तीचा प्रस्ताव द्यावा. त्यांच्या मंजुरीनंतर यंत्र दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल. याचा लाभ संबंधितांनी घ्यावा. -डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो

टॅग्स :nagpurनागपूर