शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संतूर व बासरीच्या जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:55 IST

ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी ...

ठळक मुद्देकालिदास महोत्सवाची थाटात सांगता : पं. सतीश व्यास व पं. रेणू मजुमदार यांचे बहारदार सादरीकरण

ऑनलाईन लोकमत नागपूर : ऋतुचक्रावर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाची सांगताही मोठ्या थाटात झाली. पंडित सतीश व्यास आणि सूरमणी पंडित रेणू मजुमदार यांनी सादर केलेल्या संतूर व बासरीच्या बहारदार जुगलबंदीने नागपूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.संतूर व बासरीच्या जुगलबंदीसाठी रविवारी नागपूरकर रसिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. जागतिक स्तरावरील विख्यात असलेल्या या कलावंतांनी त्यांना निराश केले नाही. व्यास यांचे कलमांवरील प्रभुत्व, सुरेल वादन तर रोणू मजुमदार यांचे मधाळ बासरीवादन यासह राग यमनच्या वादनात रसिक हरवून गेले होते.यानंतर ओडिशी नृत्य बिंदू जुनेजा आणि त्यांचा ग्रुपने सादर केले. शास्त्रीय गायनाची जुगलबंदी ऋतुरंग पंडित संजीव अभ्यंकर व अश्विनी भिडे-देशपांडे यांनी सादर केली.कविवर्य सुरेश भट सभागृह उभारल्याचे सार्थक झाले - नितीन गडकरीकालिदास समारोहाला रसिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ‘कविवर्य सुरेश भट सभागृह उभारले त्याचे सार्थक झाले’, अशी भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.या कलावंतांचे आणि त्यांच्या साथीदारांचे नितीन गडकरी आणि कांचन गडकरी यांनी स्वागत केले.कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महापालिका यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कालिदास समारोहाची रविवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. कालिदास समारोहाच्या आयोजनाबद्दल गडकरी यांनी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांचे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम’चे कौतुक केले.यावेळी गडकरी यांच्या हस्ते क्रिएशन आॅफसेटचे तरुण उद्योजक स्वप्निल पंचभाई व श्वेता पंचभाई, आकांक्षा अग्रवाल, संदीप बारस्कर, जहिर भाई, शुभांगी गाडेकर, निवेदक जैनेंद्र सिंह व रेणुका देशकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. विभागीय आयुक्त यांनी प्रास्ताविक केले.