शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:54 IST

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देभारिप आघाडीत विलीन : २० नोव्हेंबरनंतर सर्व जिल्हास्तरावर बदलाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबई दादरमधील आंबेडकर भवनात भारिपसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमसारख्या राजकीय पक्षांशिवाय फक्त सामाजिक संघटनांचाच समावेश होता. मात्र २१ ऑक्टोबरला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीबाहेर पडली. यानंतर विधानसभा निवडणुका होताच भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा हा निर्णय झाला आहे. यामुळे भारिपचे पदाधिकारीच २० नोव्हेंबरपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठे फेरबदल होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारिपच्या वंचित बहुजन आघाडीमधील विलिनीकरणानंतर ‘रिपब्लिकन’ शब्द हटविल्याने नाराजी पसरली आहे. रिपब्लिकन हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भावनिक नाते जोडतो, त्यामुळे बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गाला आणि व कार्यकर्त्यांना ‘रिपब्लिकन’ शब्दाचे विशेष महत्व आहे. भारिपच्या विलयामुळे रिपब्लिकन हा शब्दच हटविला गेला असल्याने आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ, असा पक्षातील नाराजांचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात वंचित बहुजन आघाडीमध्ये फटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकत्र काम करण्याची संधी मिळणार : डबरसेया संदर्भात प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव सागर डबरासे म्हणाले, भारिपचे वंचित बहुजन आघाडीमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय पार्टी अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत झाले आहे. यामुळे आता आघाडीला एकाच मंचावर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. विद्यमान भारिप पदाधिकारीच वंचित बहुजन आघाडीमध्येसुद्धा त्याच पदावर काम करतील. पुढील २० नोव्हेंबरपर्यंत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कमिट्यांचे गठन केले जाईल.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण