नरखेड : वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने वडिलांसोबत भांडायला सुरुवात केली. सदर भांडण विकोपास जाताच मुलाने वडिलांना दगड आणि काठीने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थडीपवनी (पुनर्वसन) येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून, जलालखेडा पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत. शंकरराव तुळशीराम देहारे (५४, रा. थडीपवनी, पुनर्वसन, ता. नरखेड) असे मृत वडिलांचे तर नितीन शंकरराव देहारे (३२, रा. थडीपवनी, पुनर्वसन, ता. नरखेड) असे आरोपी मुलाचे नाव आहे. नितीन हा विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे. आई - वडिलांशी पटत नसल्याने तो वडिलांच्याच घरी स्वतंत्र खोलीत वेगळा राहतो. वडिलोपार्जित शेती नसल्याने शंकरराव व नितीन मजुरी करून आपापला उदरनिर्वाह करायचे. दोघेही स्वतंत्र राहात असले तरी त्यांच्यात फारसे भांडण होत नव्हते.दरम्यान, नितीनला पैशाची नितांत गरज होती. त्याने वडील शंकरराव यांना पैशाची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)
मुलाने केला वडिलांचा खून
By admin | Updated: March 4, 2017 01:57 IST