शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

‘पोलीस कल्याण’साठी गाणार नेहा कक्कड : नागपुरात शनिवारी लाईव्ह इन कॉन्सर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 21:20 IST

नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देउर्वशी रौतेलाचेही सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांनी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे. १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमात सिने अभिनेत्री उर्वशी रौतेला, हास्य कलावंत अली असगर, वरुण शर्मा, ईशान खान आणि नताशा सुरी हेदेखील आपले सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस उपायुक्त विनिता साहू, उपायुक्त चिन्मय पंडित आणि उपायुक्त विक्रम साळी उपस्थित होते.

ऐनवेळी उद्भवलेल्या अडचणीत पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुरेसा निधी हाताशी असावा म्हणून ठिकठिकाणी पोलीस वेल्फेअर शो आयोजित करतात. नागपूर पोलिसांकडून तब्बल सात वर्षांनंतर अशा प्रकारचा शो ‘सूर संध्या’ चे आयोजन करण्यात येत आहे. या संबंधाने माहिती देताना अतिरिक्त आयुक्त महावरकर म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवली, त्याच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमेची गरज भासली किंवा तशीच कोणती महत्त्वाची अडचण आल्यास पोलीस कल्याण निधीचा वापर केला जातो. शहर पोलीस कल्याण निधीत पाहिजे तशी गंगाजळी नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून देणगी (डोनेशन) घेऊन त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या पासेस दिल्या जात आहे. अत्यंत शिस्तीत आणि आदर्श कार्यक्रम व्हावा, यासाठी शहर पोलीस दल प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाला येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतुकीला अडसर निर्माण होऊ नये, याचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितले. कार्यक्रमाला येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पोलीस मदत करणार आहेत. या कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांच्या सुविधांसाठी शहर पोलीस दल आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी सहा हजार प्रेक्षक येतील, अशी अपेक्षा उपायुक्त विक्रम साळी यांनी व्यक्त केली.प्रशस्त पार्किंग व्यवस्थामोठ्या संख्येत प्रेक्षक येण्याची अपेक्षा असल्याने कार्यक्रमस्थळी चार प्रवेशद्वार तयार करण्यात आले असून त्यांना वेगवेगळ्या दारातून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी पार्किंगचीही प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसNeha Kakkarनेहा कक्कर