शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

चांदणी रंग महाली...‘अप्सरा’ आली!; नटल्या-थटल्या सोनालीच्या अदांनी जिंकले नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:24 IST

वर्ल्ड आॅरेंज महोत्सवाचा समारोप सोनाली कुलकर्णीच्या नृत्याने झाला. झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तुफान डान्स करीत तिने अवघ्या सभागृहाला सैराट करून सोडले.

ठळक मुद्देझिंगाटच्या तालावर अवघे सभागृह दणाणले

आॅनलाईन लोकमतनागपूर : कोमल कायेला लाभलेले सौंदर्याचे मोहमायी पुनवचांदणे ल्याहून सोन्यात सजलेली अन् रूप्यात भिजलेली महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी मंचावरच्या चांदणी रंगमहाली अवतरली आणि तिच्या पदलालित्यातील यौवन बिजली पाहून प्रेक्षकांनी थेट तोंडात बोटे घातली. वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या समारोपीय सत्रातले सोनालीचे दुसरे सादरीकरण होते. चांदण्यांनी सजलेल्या मराठमोळ्या लावणीत सोनालीचे आरसपानी सौंदर्य खुलून दिसत होते. सोनालीला समोर बघताच तरुणाईने जल्लोषात तिचे स्वागत केले. सोनालीनेही सुहास्य वदनाने ते स्वीकारले व मयुरेश आणि त्याच्या ग्रुपच्या सोबतीने अप्सरा आली या तिच्या नटरंगमधल्या गाजलेल्या गीतावर तिने विद्युत लतेच्या गतीने बेफाम नृत्य केले. या महोत्सवाचा समारोपही सोनालीच्याच नृत्याने झाला. झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तुफान डान्स करीत तिने अवघ्या सभागृहाला सैराट करून सोडले.सिल्व्हर स्ट्रिंग्स्चा गोल्डन परफॉर्मन्ससिल्व्हर स्ट्रिंग हा विदेशी तरुणींचा भारतीय बॅण्ड. या बॅण्डच्या पाच तरुणींनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने महोेत्सवाचा नूरच बदलून टाकला. एकसारखे श्वेत-चंदेरी ड्रेस घालून सिल्व्हर स्ट्रिंगचा काफिला आपल्या इन्स्ट्रूमेंटसह स्टेजवर आला आणि आल्याआल्याच बॉलिवूड ट्रॅक्सवर तू ही तो यार बुलिया...वर धमाकेदार फ्युजन सादर केले. यानंतर एक बॉलिवूड गीत व त्याला हॉलिवूडच्या म्युझिकचा तडका असे लय भारी कॉम्बिनेशन प्रेक्षकांनी अनुभवले. यात कधी हा ग्रुप तू चीज बडी हैं मस्त मस्त गात होता तर कधी जय हो...च्या वेस्टर्न व्हर्जनवर तरुणाईला फेर धरायला लावत होता.बेफाम नाचल्या लॅटिनो गर्ल्सनागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल या महोत्सवाच्या शेवटच्या सत्राचे आकर्षण होत्या लॅटिनो गर्ल्स. चमचमत्या कपड्यातील या पाच विदेशी तरुणींनी डोेक्यावर देखणे मोरपीस लावून स्टेजवर फेर धरला तेव्हा प्रेक्षकही थक्क झाले. डान्सचा वेग तुफान असूनही या तरुणींचा आपसातील समन्वय कमालीचा होता. एकामागून एक सलग तीन हॉलिवूड गाण्यांवर सादर झालेले लॅटिनो गर्ल्सचे नृत्य प्रेक्षक डोळ्यात साठवून घेत होते.   

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरKavi Suresh Bhat Auditoriamकवी सुरेश भट सभागृह