शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नाविन्यपूर्ण संशोधनातूनच निघू शकतो समस्यांवर तोडगा; जि.प.च्या मुख्याधिकाऱ्यांचे युवकांना आवाहन

By जितेंद्र ढवळे | Updated: April 21, 2023 14:54 IST

जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. जागतिक नाविन्यतादिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शर्मा बोलत होत्या. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. डोरले सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे, एल.आय.टी. संस्थेचे संचालक डॉ. आर. बी. मानकर, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे प्रमुख डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते. 

गेल्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात नाविन्यता व उद्योजकता कार्यक्रमांतर्गत राबवायच्या हॅकेथॉन, कार्यशाळा, विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमांचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शर्मा म्हणाल्या, नागपूर विद्यापीठांतर्गत मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांचा समावेश होतो. जिल्ह्यात शाळांची संख्याही मोठी आहे. या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्तीही आहे. या प्रतिभेच्या जोरावर विद्यार्थी व युवकांनी समाजातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आर्टीफिशीयल इंटॅलीजन्सचा वापर करावा. तसेच ॲप व स्टार्टअप्स निर्मितीच्या माध्यमातून उपायात्मक संशोधन केल्यास विकासात मोठा हातभार लागेल. कौशल्य विकास विभागाच्यावतीने येत्या दोन महिन्यांदरम्यान नागपूर विभागात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यता व उद्योजकतेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या युवकांनी संधीचे सोने करावे, असेही शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ