शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत फुलविले माळरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:02 IST

विदर्भात शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्र असताना, काटोल तालुक्यातील खरसोली येथे माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत माळरान फुलविले आहे.

ठळक मुद्देदेशसेवेसोबतच मातीशी नाते जपले

सौरभ ढोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशाच्या रक्षणासाठी सैनिकाचे नाते सीमेसोबत जोडले असते. त्याचबरोबर आपण ज्या मातीतून आलो आहो, तिच्याप्रतिही त्याला निष्ठा असते. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे विदारक चित्र असताना, काटोल तालुक्यातील खरसोली येथे माजी सैनिकाने खडकाळ जमिनीत माळरान फुलविले आहे. ही अभिनंदनीय कामगिरी रत्नाकर वामनराव ठाकरे या माजी सैनिकाने बजावली आहे.देशाच्या सेवेकरिता स्व:तच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाच्या दूर राहून सीमेवर अहोरात्र काम करण्याचे धाडस हे एका सैनिकात असते. हा प्रत्येक सैनिकाचा देशाप्रतिचा त्यागच म्हणावा लागेल. परंतु सेनेतून सेवा पूर्ण करून परत आल्यानंतर काय? हा प्रश्न अनेक सैनिकांना पडतो. हाच प्रश्न रत्नाकर यांच्याही पुढे उभा झाला. सेनेत असताना घेतलेल्या अवांतर प्रशिक्षणातील काहीचा वापर त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेली जमीन कसून त्यावर फळबाग फुलवली आहे.संत्र्याची ६०० रोपटी, मोसंबीची ३०० रोपटी, चिकू, बोर, आवळा, आंबा, पपई, पेरू, डाळिंब, नारळ याची लागवड केली.त्यांची मायेने देखभाल केली. ही फळबाग बघून प्रत्येकाच्या तोंडून आपसुकच शब्द येतात ‘जय जवान,जय किसान’.रत्नाकर हे मूळचे खरसोली येथील रहिवासी असून, १९८८ ला सैन्यात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग श्रीलंका सीमेवर होती. सैन्यातील कार्यकाळात त्यांनी देशाच्या विविध सीमेवर काम केले.२००६ साली निवृत्तीनंतर त्यांना सैन्यदलातर्फे पाच एकर जमीन मिळाली. जमीन अतिशय खडकाळ व असमतोल असल्याने शेती कारायाची कशी? त्यातच जमिनीची पतही शेतीसाठी योग्य नव्हती. परंतु या जवानाने हार न पत्करता आपल्या सैन्यात मिळालेल्या प्रशिक्षणाची आठवण करीत जवानाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे ध्येय ठरवीत खडकाळ जमिनीत माळरान फुलविण्याचा संकल्प केला.सर्वप्रथम ओलितासाठी पाण्याची सोय करून जमीन समतोल केली. तलावातील गाळाचा भरणा करून त्यात संत्र्याची ६०० रोपटी, मोसंबीची ३०० रोपटी, चिकू, बोर, आवळा, आंबा, पपई, पेरू, डाळिंब, नारळ इत्यादी तर जागेचा योग्य वापर करून शेताच्या सभोवताल चंदनाची रोपटी लावली आहेत.सैन्यात असताना मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्तीनंतर सैन्याने मला या शेतात माळरान फुलविण्याचे सामर्थ्य दिले, याचा मला अभिमान आहे.- रत्नाकर ठाकरे,माजी सैनिक, खरसोली.

टॅग्स :agricultureशेती