शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सौरऊर्जेला मनपाचा रेड सिग्नल

By admin | Updated: May 25, 2016 02:33 IST

विजेची बचत व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यायला हवा, असा संदेश शासनाकडून देण्यात येतो.

नागपूर : विजेची बचत व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यायला हवा, असा संदेश शासनाकडून देण्यात येतो. परंतु नागपूर महानगरपालिकेने मात्र याला फारसे गंभीरतेने घेतलेले नाही. १४९ सिग्नल असलेल्या शहरात केवळ ५ सिग्नलच सौरऊर्जेवर चालत आहेत. यातूनच मनपाचा सौरऊर्जेबाबतची उदासीनता दिसून येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहरातील सिग्नलसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. शहरात किती सिग्नल आहेत, यातील सौरऊर्जेवर तसेच ‘एलईडी’ लाईट असलेले किती सिग्नल चालतात, सिग्नलसाठी खर्च किती झाला इत्यादीबद्दल त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार शहरात सौरऊर्जेवर केवळ पाचच सिग्नल चालतात. यात वनिता विकास चौक, भरतनगर चौक, पत्रकार कॉलनी चौक, कामगार नगर चौक व नवीन काटोल नाका चौक यांचा समावेश आहे. यातील काही सिग्नल तर बरेचदा बंदच असतात. अशा स्थितीत ऊर्जाबचतीचा संकल्प केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत शहरामध्ये १० नवीन सिग्नल लावण्यात आले. यासाठी ६० लाख ६६ हजार ३१३ रुपयांचा खर्च आला. म्हणजेच प्रत्येक सिग्नलसाठी सरासरी ६ लाख ६ हजार ६३१ रुपये खर्च झाले. यातील मेयो हॉस्पिटल चौक, टी.बी.वॉर्ड, आनंद टॉकीज, विजय टॉकीज येथील सिग्नल तर नेहमीच बंद राहतात. जर सिग्नल बंदच ठेवायचे होते तर इतका खर्च तरी का केला असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. या कालावधीत ‘जीएलएस’ असलेले १० सिग्नल खराब झाले. यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३९ लाख ५६ हजार १८८ रुपये खर्च झाले. (प्रतिनिधी)१३ सिग्नल ‘आॅफ’नागपुरात एकूण १४९ वाहतूक सिग्नल आहेत. यातील १३ सिग्नल नादुरुस्त असून, १३६ सिग्नल चालण्याजोगे आहेत. १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत नवीन सिग्नल लावणे किंवा नादुरुस्त सिग्नल बसविणे यासाठी मनपातर्फे १ कोटी २२ हजार ५०१ रुपयांचा खर्च करण्यात आला.