शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

 करपेंनी स्थापन केलेली सोसायटी बोगस : बळजबरीने वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:22 IST

निर्मल नगरीचे रहिवासी प्रमोद मानमोडे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. प्रफुल्ल करपे यांनी स्थापन केलेली ‘निर्मल नगरी कंडोनियम’ ही सोसायटी बोगस आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तयार केली असून सहकार विभागाकडे नोंद नाही. सोसायटीच्या नावाखाली बनावट रसीदद्वारे बळजबरीने वसूल करण्यात येणारी वर्गणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचा आरोप नगरीतील रहिवासी प्रफुल्ल मनोहर शेंडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देनिर्मल नगरीचे रहिवासी मानमोडेंच्या समर्थनार्थ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निर्मल नगरीचे रहिवासी प्रमोद मानमोडे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. प्रफुल्ल करपे यांनी स्थापन केलेली ‘निर्मल नगरी कंडोनियम’ ही सोसायटी बोगस आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तयार केली असून सहकार विभागाकडे नोंद नाही. सोसायटीच्या नावाखाली बनावट रसीदद्वारे बळजबरीने वसूल करण्यात येणारी वर्गणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचा आरोप नगरीतील रहिवासी प्रफुल्ल मनोहर शेंडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.शेंडे म्हणाले, बोगस सोसायटीला रहिवाशांचा विरोध आहे. सोसायटीची माहिती २० डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी आणि सहकार निबंधकांना लेखी पत्राद्वारे कळविली आहे. सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल नामदेवराव करपे बोगस रसीद फाडून बळजबरीने रहिवाशांना सोपवून वसुली करीत आहेत. स्वयंघोषित कंडोनियमला आम्ही पूर्वीही नाकारले आहे. या सोसायटीने निर्मल नगरीत दबावाचे वातावरण निर्माण केले आहे. विनाकारण तणाव आणि रहिवाशांची दिशाभूल करीत आहेत. बहिष्कार टाकण्याच्या धमक्या सोसायटीची माणसे देत असल्याचा आरोप शेंडे यांनी केला.निर्मल नगरीच्या व्यवस्थापनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. येथील रहिवाशांचे मेंटनन्सचे जमा असलेले पैसे आमचा विरोध असलेल्या सोसायटीला परत करायचे असतील तर त्यांना न देता निर्मल नगरीतील रहिवाशांना वैयक्तिक स्वरुपात द्यावे, अशी मागणी शेंडे यांनी केली. येथील रहिवाशांची फ्लॅट, रो-हाऊसेस, बंगला व गाळेधारक अशी वेगळी हाऊसिंग सोसायटी तयार करून पैसे द्यावेत, असे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेत गीता शेंडे, माधुरी मोरे, उषा इंगळे, शोभा सोळंखी, केशर प्रचंड, शीतल भांडारकर, कृष्णा उगले, नितेश इंगळे आणि अनेक रहिवासी उपस्थित होते.