शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संघ शिक्षा वर्गात ‘सामाजिक समरसता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 10:43 IST

देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील याचे प्रतिबिंब दिसून येत आहे.

ठळक मुद्देकुठलाही भेदभाव नाही तिशीच्या आतील ५५ टक्के शिक्षार्थी नोकरीवर पाणी सोडण्याचीदेखील तयारी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक समरसतेची मोहीम राबवत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातदेखील याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. या वर्गात जात-पात, शिक्षण, संपत्ती, वय या सर्वांना बाजूला ठेवून स्वयंसेवक गेल्या २५ दिवसांपासून एकत्रित धडे घेत आहेत. एकाच गणामध्ये कोट्यधीश व्यावसायिक आणि दोन वेळच्या भाकरीसाठी घाम गाळणारा कामगारदेखील समाविष्ट आहे. विशेष म्हणजे यंदा तिशीच्या आतील ५५ टक्के शिक्षार्थी असून अनेकांनी तर या शिक्षा वर्गात सहभागी होण्यासाठी प्रसंगी नोकरीवरदेखील पाणी सोडण्याची तयारी दाखविली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बदलत्या काळाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातदेखील बदल झाले असून तृतीय वर्ष वर्गासाठी ‘सिलेक्शन’ प्रणालीद्वारे स्वयंसेवकांना संधी मिळते. तृतीय वर्गात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांची ठराविक पातळ््यांपासून निवड करण्यात येते.साधारणत: तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात येते. दरवर्षीनुसार यंदादेखील वयानुसार आणि विषयानुसार स्वयंसेवकांचे गण म्हणजेच गट पाडण्यात आले. म्हणजे ज्यांनी दंडयुद्ध विषय निवडला आहे आणि कॉलेजवयीन आहेत असे एका गणात. योगासन विषय आणि वय यानुसार वेगळा गण. प्रत्येक गणात सर्व प्रदेशांच्या स्वयंसेवकांना सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून त्यांच्यातील सामाजिक समरसता वाढीस लागावी व विचार-संस्कृतीचे आदानप्रदान करता यावे, हा यामागचा उद्देश आहे, अशी माहिती एका संघ पदाधिकाऱ्याने दिली.

संघाचा तरुण चेहरा सहभागीयंदाच्या शिबिरात देशभरातील ४१ विविध प्रांतांमधून आलेले ७०९ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यांचे वय १८ ते ४० यादरम्यानच आहे. संघ शिक्षा वर्गाचा चेहरादेखील तरुणच असून शिक्षार्थ्यांचे सरासरी वय ३० वर्षे इतके आहे. ३९४ शिक्षार्थ्यांचे वय हे ३० किंवा त्याहून कमी आहे. २० वर्षांहून कमी वय असलेले ११ स्वयंसेवकांचादेखील यात समावेश आहे. तर ३५ ते ४० या वयोगटातील १५७ शिक्षार्थी वर्गात आहेत. वर्गात सहभागी झालेल्यांपैकी ११३ जण हे विद्यार्थी आहेत. ५०१ जण नोकरी व व्यावसायिक आहेत. विशेष म्हणजे या वर्गात ८८ प्रचारक व ७ विस्तारकदेखील समाविष्ट आहेत. ३५० शिक्षार्थी हे हिंदी भाषिक आहेत. तर मराठी भाषिक असलेले ६० स्वयंसेवक वर्गात सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांचादेखील समावेशतृतीय वर्ग संघ शिक्षा वर्गात ४५ शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. पेरणीअगोदरची कामे असतानादेखील ते वेळ काढून नागपुरात आले असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली. याशिवाय ११७ शिक्षक, १६ अभियंता, १६ वकील, ६ पत्रकार, ६ डॉक्टर हेदेखील या वर्गात सहभागी झाले आहेत.

बहुतांश शिक्षार्थी पदवीधरतृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात देशाच्या सर्व भागातून स्वयंसेवक आले असून ग्रामीण भागातील संख्या जास्त आहे. मात्र असे असले तरी बहुतांश शिक्षार्थी हे पदवीधर आहेत. एकूण शिक्षार्थ्यांपैकी ३७५ जण हे पदवीधर आहेत, तर १९१ जण हे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. तर ६ जण हे ‘पीएचडी’ प्राप्त आहेत.

स्वयंसेवकांनीच केले वर्गाचे नियोजनवर्ग व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी हीदेखील स्वयंसेवकांवरच देण्यात आली आहे. वर्गात सहभागी न झालेल्या स्वयंसेवकांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. यात शिबिरार्थ्यांचे निवास, भोजन, वैद्यकीय, प्रसिद्धी, नोंदणी, सुरक्षा, विद्युत, वस्तू भांडार, विद्युत व ध्वनी, परिवहन, स्वच्छता, प्रक्षालन, रक्षणव्यवस्था अशा २७ विविध प्रकारच्या व्यवस्थांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात सहभागी न होणाऱ्या स्वयंसेवकांनादेखील नियोजन, नियंत्रण, व्यवस्थापन यांचे एक प्रकारचे प्रशिक्षणच घेण्याची संधी मिळाली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ