शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हुंदके झाले कोरडे, अन् डाव साधला मृत्यूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:05 IST

माणसातील हैवानाच्या रूपाने ! क्षणात राख झाली स्वप्नांची अन् आयुष्यातील परिश्रमांची ! तरीही ती जगत राहिली; झुंजत राहिली; वेदनेने विव्हळत सात दिवस मृत्यूला रोखत राहिली. पण.. अखेर ‘ती’ हरली; नियती जिंंकली अन् माणुसकी धडाधडा जळत राहिली.. तिच्या शरीरासारखी!

ठळक मुद्देहिंगणघाट जळीत प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सात दिवस मृत्यूशी निकराची झुंज देऊन अखेर ‘ती’ गेली. ध्यानीमनी नसताना अकस्मातपणे साक्षात मृत्यू तिच्यापुढे प्रगटला... माणसातील हैवानाच्या रूपाने ! क्षणात राख झाली स्वप्नांची अन् आयुष्यातील परिश्रमांची ! तरीही ती जगत राहिली; झुंजत राहिली; वेदनेने विव्हळत सात दिवस मृत्यूला रोखत राहिली. पण.. अखेर ‘ती’ हरली; नियती जिंंकली अन् माणुसकी धडाधडा जळत राहिली.. तिच्या शरीरासारखी!३ फेब्रुवारीची घटना. वेळ सकाळची. कठोर परिश्रमातून प्राध्यापिका होऊन आयुष्यातील सुखाच्या स्वप्नाची पहाट उमलण्याची वाट पहाणाऱ्या ‘तिच्या’ आयुष्यातील ही सकाळ मात्र यमदूतासारखी ठरली. एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या विक्की नगराळे याच्या मनातील सैतान जागा झाला. स्वत:सोबत तिच्याही आयुष्याची राखरांगोळी करायला निघालेल्या या नरपशूने पेट्रोलच तिच्या तोंडावर फेकले अन् टेंभ्याने आग लावली. काही क्षणातच ती ३५ टक्क्यांवर जळली. बाहेरच्या जखमांपेक्षा अंतर्गत जखमा खूपच गंभीर होत्या. श्वसननलिका व फुफ्फुसच क्षतिग्रस्त झाले होते. आवाज गेला होता. डोळ्यांवर सूज असल्याने ते उघडताही येत नव्हते. श्वास घेणेही कठीण झाले होते. त्या स्थितीतह ती शुद्धीवर होती. वेदना सहन करीत प्रत्येक दिवस मृत्यूला हुलकावणी देत होती. तिच्या ‘विल पॉवर’मुळे डॉक्टरही चकित होते. सारेच म्हणत होते, ती वाचायलाच हवी... ती वाचायला हवी..! अथक प्रयत्नांतून उपचार सुरू होते. परंतु नियतीच्या मनात मात्र काही वेगळे होते. सोमवारी पहाटे अचानक हृदयाचे ठोके कमी झाले. पहिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यातून ती बाहेरही आली, परंतु तासाभरातच पुन्हा दुसरा झटका आला आणि तिने शेवटचा श्वास घेतला. सात दिवसांपासून सुरू असलेली तिची चिवट झुंज अपयशी ठरली. माणसातील राक्षसाचा काळा चेहरा उघडा करून ती गेली... कायमचीच! समाजमनाचे हुंदके कोरडे करून... महाराष्ट्राच्या गळ्यात गहिवर दाटून!सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता या जळीत पीडितेला हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांच्या मार्गदर्शनात जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवनवार, क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल व इतर डॉक्टरांच्या मदतीने तातडीने उपचाराला सुरुवात केली. डोके, चेहरा, दोन्ही हात, खांदे, वरचा पाठीचा भाग, संपूर्ण मान, छाती जळाली होती. श्वसननलिकेला व फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली होती. मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख व नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केसवानी यांनी पीडितेला भेट दिली. पुढील सात दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉ. केसवानी म्हणाले. जंतू संसर्गाचा धोका ओळखून अतिदक्षता विभागातील दहा खाटा रिकाम्या ठेवल्या. विशेष शस्त्रक्रिया करून जखमांवर मलमपट्टी केली जात होती. गुरुवारी रक्तदाब कमी-जास्त झाला. अ‍ॅण्टिबायोटिकचा डोज वाढविण्यात आला. शुक्रवारी कृत्रिम नळीद्वारे तिला जेवण देण्यात आले. परंतु त्याच दिवशी रात्री श्वास घेणे कठीण झाले. व्हेंटिलेटर लावण्यात आले. जंतू संसर्ग वाढत होता. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी पहाटे ४ वाजता हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यातून तिला बाहेर काढले, परंतु तासाभरानंतर पुन्हा आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात तिची प्राणज्योत मालवली. तिचे कुटुंबच नव्हे तर हॉस्पिटलची चमूही हळहळली.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटDeathमृत्यू