शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

... तर झूम अ‍ॅपवर बंदी का नाही? ‘कॅट’चा केंद्राकडे सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:10 IST

झूमची तंत्रज्ञानाची विकासक चमू चीनमध्ये आहे. त्यांच्यातर्फे संशोधन आणि विकास केंद्र चालविण्यात येते. झूमला अ‍ॅपला भारतीय अ‍ॅप पर्याय ठरू शकतो. त्यामुळे चलन भारतात राहून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देभारतीय अ‍ॅप ठरू शकतो पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर देशात सर्वाधिक उपयोगात येणाऱ्या झूम अ‍ॅपवर बंदी का नाही, असा सवाल किरकोळ व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्राला ७ जुलैला पाठविलेल्या एका निवेदनात करताना या अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये बैठका आणि वेबिनारसाठी झूम अ‍ॅपचा उपयोग वाढला आहे. या अ‍ॅपला भारतीय अ‍ॅप पर्याय ठरू शकतो. याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. झूमचा डेटा भारतातच ठेवण्यात येतो वा सर्व्हरमार्फत चीनमध्ये जातो, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे झूमच्या तंत्रज्ञानावर आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. भारतीय सैन्यदलाने आपल्या कर्मचाऱ्यांना झूमसह ८९ अ‍ॅप हटविण्यास सांगितल्याचे एएनआयच्या ९ जुलैच्या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिका आणि अन्य देशांनी डेटाच्या सुरक्षेवर व झूमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. त्यामुळेच कॅटने एकदा पुन्हा सरकारने झूम अ‍ॅपवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया म्हणाले, झूमवरील भारतीयांचा डेटा चीनला वा अन्य देशांना पाठविला जातो. भारतीय डेटा कुठे ठेवला जातो वा त्यांचा काय उपयोग करण्यात येतो, याची माहिती देण्यास झूम असफल ठरला आहे. माहितीनुसार झूमचे सॉफ्टवेअर चीनच्या तीन कंपन्यांनी विकसित केले आहे. झूमची तंत्रज्ञानाची विकासक चमू चीनमध्ये आहे. त्यांच्यातर्फे संशोधन आणि विकास केंद्र चालविण्यात येते. झूमला अ‍ॅपला भारतीय अ‍ॅप पर्याय ठरू शकतो. त्यामुळे चलन भारतात राहून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान