शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तर संस्थेची चूक काय? प्रशिक्षणाचे पैसे देण्यास प्रकल्प कार्यालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:05 IST

आदिवासी विभागाच्या नागपूर प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचा निधी देण्यास नकार दिला. आमची संस्था नियमित सुरू होती पण विद्यार्थी नियमित येत नव्हते, सराव करीत नव्हते, त्यामुळे ते नापास झाले. त्यात आमची चूक काय, असा सवाल आता संस्थाचालकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विभागात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी खासगी संस्थेमध्ये प्रविष्ट करण्यात आले. विद्यार्थी नियमित संस्थेत येत नव्हते, सराव करीत नव्हते. त्यामुळे संगणक टायपिंगच्या परीक्षेत ते नापास झाले. त्यामुळे आदिवासी विभागाच्या नागपूर प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचा निधी देण्यास नकार दिला. आमची संस्था नियमित सुरू होती पण विद्यार्थी नियमित येत नव्हते, सराव करीत नव्हते, त्यामुळे ते नापास झाले. त्यात आमची चूक काय, असा सवाल आता संस्थाचालकांनी केला आहे.२०१८-१९ केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरतर्फे संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा शहरातील एका संस्थेत सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ६ महिन्याच्या कालावधीसाठी हे प्रशिक्षण होते. संस्थेचे प्रशिक्षणाचे कार्य नियमित सुरू होते. पण प्रकल्प कार्यालयातर्फे जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते ते नियमित येत नव्हते. प्रकल्प कार्यालयातून दर महिन्याला संस्थेची तपासणी होत होती. तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा संस्थेतर्फे ही बाब लक्षात आणून दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जानेवारी २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आली. ज्या संस्थेत हे विद्यार्थी शिकत होते त्या संस्थेचा निकाल ८० टक्के लागला. मात्र या परीक्षेत लाभार्थी असलेले आदिवासी विभागाचे काही विद्यार्थी नापास झाले, काहींनी परीक्षाच दिली नाही. त्यामुळे प्रकल्प कार्यालयाने संस्थेच्या प्रशिक्षणाचा निधी देण्यास इन्कार केला आहे, असा आरोप संस्थाचालक देवेंद्र हेडावू यांनी केला आहे. सध्या कोरोनामुळे संगणक, टायपिंग या संस्था गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. अशात प्रकल्प कार्यालयाकडून दिलेल्या प्रशिक्षणाचे शुल्क मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाStudentविद्यार्थी