शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू : कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:52 IST

विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात सन्मानजनक स्थान न मिळाल्यास रिपब्लिकन महाआघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला.दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, मागासवर्ग व अल्पसंख्यांक अशा वंचितांना एकसंघ करून वाटचाल करण्यासाठी ही महाआघाडी स्थापन करण्यात आली असून महाआघाडीचा जनशक्ती महामेळावा येत्या १७ ऑगस्ट रोजी नाशिक येथे हाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महामेळाव्यात नानासाहेब इंदिसे, डॉ. राजेंद्र गवई, गंगाधर गाडे अशा सर्व रिपब्लिकनवादी नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जयदीप कवाडे व इतर नेता उपस्थित होते.काश्मीरचे स्वागत पण प्रक्रिया चुकीचीजम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या ३७० कलम निरस्त करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे प्रा. कवाडे यांनी स्वागत केले. मात्र केंद्र शासनाने अवलंबलेली प्रक्रिया चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली. संविधानिक मार्गाचा अवलंब करून जम्मू काश्मीरची जनता व तेथील विधानसभेच्या मंजुरीने हे झाले असते तर योग्य झाले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेPoliticsराजकारण