शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मरकजहून आलेले आतापर्यंत ९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 21:32 IST

दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहून आलेल्या १९७ संशयितांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यातील ६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३१ नमुन्यांची तपासणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, यातील मरकजहून आलेले ९ संशयित कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देदिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले १९७ संशयित : आतापर्यंत केवळ ६६ नमुन्यांची तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहून आलेल्या १९७ संशयितांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. यातील ६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३१ नमुन्यांची तपासणी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, यातील मरकजहून आलेले ९ संशयित कोरोनाबाधित आढळून आले आहेत.नागपुरात ३० मार्चपर्यंत बाधित आलेल्यांची साखळी खंडित झाली होती. परंतु पाच दिवसानंतर पहिल्या कोरोनाबाधित मृताची नोंद होताच रुग्णांची संख्या वाढू लागली. यात भर पडली ती दिल्ली, निजामुद्दीन किंवा मरकजहूुन नागपुरात आलेल्यांची. यातील सुमारे १९७ संशयितांना आमदार निवास, रवी भवन, वनामती व लोणारा येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यांची तातडीने नमुने तपासणी होणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत ६६ नमुन्यांची तपासणी झाली असून १३१ नमुन्यांची तपासणी शिल्लक आहे. मरकजहून आलेल्यांमध्ये रविवारी जबलपूरमधील चार, मोमीनपुऱ्यातील एक तर सतरंजीपुऱ्यातील एक तर सोमवारी जबलपुरचेच आणखी तीन असे ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे इतरांची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य संशयित संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. यातील काहींचे एकमेकांच्या खोलीत ये-जा असल्याने व वऱ्हांड्यात ते फिरत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या