शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

एसएनडीएलच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार

By admin | Updated: February 23, 2015 02:29 IST

एसएनडीएलच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्यासाठी १५ दिवसात चौकशी समिती गठित केली जाईल. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अथवा मंत्रालयातील सचिव असतील,...

नागपूर : एसएनडीएलच्या कार्यपध्दतीची चौकशी करण्यासाठी १५ दिवसात चौकशी समिती गठित केली जाईल. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अथवा मंत्रालयातील सचिव असतील, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली. काटोल मार्गावरील विद्युत भवनात एसएनडीएलच्या कामकाजाची समीक्षा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले, एसएनडीएलने फ्रेचाईजी घेण्यासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केले काय, त्याची चौकशी ही समिती करेल. शिवाय कंपनीच्या ग्राहक सेवा आणि तक्रारींचीही चौकशी केली जाईल. दरम्यान, अहवालाच्या आधारे कारवाई करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता पालकमंत्र्यांनी ‘सरकार त्याचा निर्णय घेईल‘ असे सांगून थेट उत्तर देण्याचे टाळले. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी एसएनडीएलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावून ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, अशी मागणी केली. महावितरणच्या काळात महापालिकांच्या उद्यानात कमी दरात वीजपुरवठा केला जात होता. एसएनडीएल मात्र व्यावसायिक दराने शुल्क वसुल करीत असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. एसएनडीएलचे स्वत:चे आयटी सेंटर नसल्याचे आणि महावितरणच्या मालमत्तेचा एसएनडीएल मालमत्ता कर देत नसल्याचा मुद्दादेखील महापौर दटके यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)