शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांना स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:31 IST

स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी २० जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.आता पावसाळा सुरू झाल्यामुळे साप बाहेर निघण्याचे प्रकार वाढणार आहेत. अशावेळी नागरिकांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर साप पकडण्यासाठी संबंधित व्यक्तींना पाचारण केले जाते. मात्र बरेचदा अशा व्यक्तींना यासंदर्भात अपुरे ज्ञान असते. यामुळे दुर्घटना घडतात. तसेच सापाला पकडून ठेवणे, उपाशी ठेवणे तसेच त्याचे प्रदर्शन करणे यासारखे अनुचित प्रकार घडतात.नागपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नाग, मण्यार, फुरसे, घोणस, पट्टेरी मण्यार, चापडा हे विषारी साप, तसेच मांजऱ्या, हरणटोळ, अंडीभक्षक साप, फॉस्टेन मांजऱ्या हे निमविषारी आणि तस्कर, अजगर, धामण, कुकरी, कवड्या, पट्टेरी कवड्या, पानदिवड, रुखई, गवत्या, धुळ नागीण, नानेटी, वाळा हे बिनविषारी साप अस्तित्वात आहेत. काही सर्पमित्र साप पकडून कित्येक दिवस घरी बाळगतात. साप हा वन्यजीव (संरक्षण), अधिनियम १९७२ च्या अनुसूचीमध्ये मोडतो. त्यामुळे सापांबद्दल होणारे असे प्रकार टाळण्यासाठी सर्पमित्रांनी आपल्या नावाची नोंद वन विभागाकडे करून घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी केले आहे. आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्रासह सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे उपस्थित राहून सर्पमित्रांना आपल्या नावाची नोंद या मुदतीत करून घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :snakeसापforest departmentवनविभाग