शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी; तीन लाखांचा, १५ किलो गांजा जप्त

By नरेश डोंगरे | Updated: April 9, 2024 23:47 IST

आमगाव आणि गोंदिया दरम्यान धावत्या रेल्वेत आरपीएफची कारवाई

नागपूर : हावडा अहमदाबाद एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) हाणून पाडत गांजाचे सात पॅकेट जप्त केले. आमगाव आणि गोंदिया दरम्यान धावत्या रेल्वे गाडीत आरपीएफने सोमवारी ही कारवाई केली.

देशभरात लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधून मोठी रोकड, अंमली पदार्थ आणि अशीच वेगवेगळी खेप ईकडून तिकडे केली जात असल्याचे लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी विशेष तपासणी पथके तयार केली आहेत. विविध रेल्वे गाड्यांमध्ये ही पथके तपासणी आणि कारवाई करतात. सोमवारी हावडा अहमदाबाद एक्सप्रेस नागपूरकडे येत असताना आमगाव-गोंदियाच्या मध्ये तिसऱ्या जनरल कोचमध्ये एका सीटखाली तीन बॅग ठेवून दिसल्या. संशय आल्याने या बॅग कुणाच्या आहेत, अशी कोचमधील प्रवाशांना विचारणा केली असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावरून गोंदिया स्थानकावर त्या बॅग उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये गांजाची सात पाकिटं आढळली. त्यात एकूण १४ किलो ५३४ ग्राम गांजा होता. अंमली पदार्थाच्या बाजारात त्याची किंमत २ लाख, ९० हजार, ६८० रुपये एवढी आहे. हा गांजा कुणी कुुठून आणला आणि तो कुठे नेणार होता, हे मात्र आरोपी हाती न लागल्याने स्पष्ट होऊ शकले नाही.ऑपरेशन नार्कोस सुरू

या संबंधाने आयुक्त दीपचंद आर्य यांनी अंमली पदार्थांची रेल्वे गाड्यांमधून होणारी तस्करी थांबविण्यासाठी 'ऑपरेशन नार्को'स राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. सोमवारच्या कारवाईत पीएसआय अजय चाैबे, प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, आरक्षक विकास पटले, डी. एन. यादव यांची सतर्कता कामी आल्याचेही आर्य यांनी सांगितले.