शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
3
शौचालयात गेलला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
4
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
5
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
6
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
7
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
8
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
9
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
10
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
11
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
12
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
13
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
14
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
15
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
16
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
17
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
18
बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड?
19
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
20
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!

वीज कर्मचाऱ्यांच्या घरी लागले स्मार्ट प्रीपेड मीटर  

By आनंद डेकाटे | Updated: May 22, 2024 21:08 IST

आता सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी लागणार.

नागपूर : नवीन तंत्रज्ञानाने बचतीचा दावा करत महावितरणने नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रथम मीटर बसविण्यात आले आहेत. आता काही दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी जुन्या मीटरच्या जागी हे मीटर बसवण्यास सुरुवात होणार आहे.

 महावितरणने कमी दाबाच्या प्रत्येक श्रेणीतील २ कोटी ४२ लाख ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यापासून केवळ कृषी पंप ग्राहकांना दूर ठेवण्यात आले आहे. वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट मीटर, गेटवे आणि डेटा सेंटरमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीची चाचणी घेतल्यानंतर मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे स्मार्ट मीटर आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्याचा दावा महावितरणने केला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. मीटर मोफत बसवले जात आहेत. खराब झाल्यास, ते विनामूल्य बदलले जातील. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतलेला हाच निर्णय लागू राहील. मात्र या माध्यमातून ग्राहकांना विजेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत हैप्पी अवर्सग्राहक मोबाइलप्रमाणेच स्मार्ट प्रीपेड मीटरचे ऑनलाइन रिचार्ज करू शकतील. त्यांना दररोज किती वीज वापरली गेली आणि किती उपलब्ध आहे याची माहिती दिली जाईल. संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत आनंदाचे तास (हैप्पी अवर्स) असतील. या कालावधीत रक्कम संपली तरी पुरवठा खंडित होणार नाही. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही रिचार्ज संपला तरी वीज कापली जाणार नाही. ग्राहक ऑनलाइन तसेच ऑफलाइन रिचार्ज करू शकतील.

 काय-काय बंद होईलस्मार्ट मीटर बसवल्यानंतर मीटर रीडिंग, वीजबिल तयार करणे, वितरण करणे बंद होईल. मोबाईलप्रमाणेच वीज रिचार्ज करून आवश्यकतेनुसार वापरावी लागणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे चुकीचे रीडिंग किंवा सरासरी बिले येणे बंद होईल. स्मार्ट मीटरचे मासिक बिल वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध असेल. गरज भासल्यास ग्राहक त्याची प्रिंट काढू शकेल.

टॅग्स :nagpurनागपूर