शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

स्मार्ट सिटी प्रकल्प; जमिनीच्या बदल्यात भरपाईची तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 11:08 IST

‘लँड पुलिंग’च्या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. जमीन मालकांचे यामुळे नुकसानच होत आहे. त्यामुळे ‘टीपी स्कीम’ला कुठल्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये, अशी भूमिका माजी महापौर प्रवीण दटके यांनी मांडली.

ठळक मुद्दे‘लॅन्ड पुलिंग’ प्रणालीपासून भाजप नगरसेवकच असंतुष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील १,७३० एकर क्षेत्रात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘लँड पुलिंग’ प्रणाली हा या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा बनत आहे. ६०:४० च्या सूत्रामुळे भूधारकांमध्ये आता स्वत:ची फसवणूक झाल्याची भावना आहे. या प्रणालीने भाजपाचे लोकप्रतिनिधीदेखील असंतुष्ट आहे. यामुळेच सर्वसाधारण सभेदरम्यान ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या ‘टीपी स्कीम’ला मंजुरी न देता पुढील सभेत सखोल चर्चा करण्यासाठी आग्रह करण्यात आला.‘लँड पुलिंग’ प्रणालीमध्ये जमिनीच्या मालकाकडून ४० टक्के जमीन घेण्यात येईल. परंतु त्याची कुठलीही भरपाई देण्यात येणार नाही. ६० टक्के जमीनदेखील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प विभाग आपल्या हिशेबाने दुसऱ्या जागी देईल. त्यासाठी विकास शुल्क भरणे आवश्यक आहे. यामुळे हे सूत्र जमीन मालकांना मंजूर नाही. गुरुवारी महालमधील टाऊन हॉल येथे नगर रचना विभागातर्फे सर्वसाधारण सभेदरम्यान ‘स्मार्ट सिटी’च्या ‘टीपी स्कीम’ला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ‘लँड पुलिंग’च्या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. जमीन मालकांचे यामुळे नुकसानच होत आहे. त्यामुळे ‘टीपी स्कीम’ला कुठल्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये, अशी भूमिका माजी महापौर प्रवीण दटके यांनी मांडली. पारडी स्मशानघाटासाठी मनपाने अर्धा एकर जमीन आरक्षित ठेवली होती. त्याच्या बाजूला तलमलेची २५ एकर जमीन आहे. नासुप्रतून ‘स्मार्ट सिटी’ची जमीन जशी मनपाला हस्तांतरित झाली, तसे त्याचे आरक्षण बदलण्यात आले. तलमलेच्या आरक्षित जमिनीलादेखील नियमांना बाजूला सारुन नियमित करण्यात आले. ही जमीन चार लोकांना विकण्यात आल्याची माहिती आहे. येथे तर घाट बनणे आवश्यक होते, असे प्रतिपादन बाल्या बोरकर यांनी केले.

९५ टक्के संपत्तीधारकांचे आखीव पत्रिकेवर नावच नाहीपूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडीच्या ज्या भागांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यात येत आहे, तेथील ९५ टक्के संपत्तीधारकांच्या नावाची ‘सिटी सर्व्हे’मध्ये नोंदच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आखिव पत्रिकेत नाव नसल्याने नागरिक भयभीत आहेत. तेथे गुंठेवाडी अंतर्गत प्लॉट्स नियमित करण्यात येत आहेत. मोठमोठे ले-आऊट्स टाकून गरिबांना कमी किमतीवर अनेक वर्षांअगोदर प्लॉट्स विकण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक येथे राहत आहेत. केवळ आखिव पत्रिकेवर नाव नसल्याने त्यांना भरपाई न देणे किंवा प्रकल्पाचा लाभ न देणे हे तर्कसंगत नाही. मनपाच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील याची माहिती आहे.मनमानी सुरू आहेस्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनीदेखील पारडी घाटासाठी आरक्षित जमीन देण्याची मागणी केली. पारडी परिसर वेगाने वाढत आहे. घाटाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत जमिनीचे आरक्षण बदलण्याचे षड्यंत्र चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

‘लँड पुलिंग’ प्रणालीत अनेक त्रुटीपूर्व नागपुरात बरेचसे लोक फारसे शिकलेले नाहीत. त्यांना अंधारात ठेवून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जर कुणाची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, तर त्याला भरपाई मिळायलाच हवी. लोकप्रतिनिधींनादेखील अंधारात ठेवले गेले, असा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी लावला.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी