शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी प्रोजेक्ट : बैठक निष्फळ, आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:57 IST

पूर्व नागपुरात प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. एकीकडे या प्रकल्पात वसलेल्या कॉलनीवरून रस्ते जात आहेत तर दुसरीकडे प्रकल्पांतर्गत ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई न देता डिमांड थोपवले जात आहे. या सर्व मुद्याबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि नासुप्र सभापती शीतल उगले यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत केवळ आश्वासन देण्यात आले. कुठल्याही प्रकारचे लिखित आश्वासन मिळाले नाही. यामुळे आंदोलनकर्ते नाराज झाले. बैठकीत पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरात प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पावरून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. एकीकडे या प्रकल्पात वसलेल्या कॉलनीवरून रस्ते जात आहेत तर दुसरीकडे प्रकल्पांतर्गत ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई न देता डिमांड थोपवले जात आहे. या सर्व मुद्याबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि नासुप्र सभापती शीतल उगले यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत केवळ आश्वासन देण्यात आले. कुठल्याही प्रकारचे लिखित आश्वासन मिळाले नाही. यामुळे आंदोलनकर्ते नाराज झाले. बैठकीत पोलीस अधिकारीही उपस्थित होते.विशेष म्हणजे २ फेब्रुवारी नागपूर सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे लोकार्पणसह स्मार्ट सिटी अभियान व अमृत अभियान अंतर्गत पाणीपूरवठा योजनेचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीत पोलीस व प्रशासन आहेत. या दरम्यान स्मार्ट सिटीच्या प्रारुपाविरुद्ध लोकांमध्ये असंतोष जाहीर करणे, पारडी चौकात आंदोलन आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून आश्वासन देणे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.आंदोलनकर्ते व नागरिकांचा आरोप आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. हा प्रकल्प लोकांवर थोपविला जात आहे. यात अनेक लोक बेघर होतील. नुकसान भरपाईची पद्धतही पूर्णत: चुकीची आहे. ज्यांची ४० टक्के जमीन घेतली जात आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यानंतर उरलेल्या ६० टक्के जागेवर डिमांड जारी करणे, हा कुठला न्याय आहे. बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलनकर्त्यांचा असंतोष आणखी वाढला आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका