शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त नागपूर देशात ‘टॉप’ , अहमदाबादलही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:08 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूर पहिल्या स्थानावर होते. सध्या दर शुक्रवारी साप्ताहिक आधारावर नवीन यादी जारी केली जाते.

ठळक मुद्देप्रकल्पांतर्गत विविध विकासकामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूर पहिल्या स्थानावर होते. सध्या दर शुक्रवारी साप्ताहिक आधारावर नवीन यादी जारी केली जाते.अनेक दिवसांपासून नागपूर दुसऱ्या क्रमांकावर होते. गुजरातमधील अहमदाबाद शहर पहिल्या क्रमांकावर चालत होते. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूरला पुन्हा एकदा पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये नागपूरला ३६७.४२ अंक मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या अहमदाबादला ३६७.३६ अंक मिळाले आहे. ०.६ अंकाने नागपूर समोर आहे. ३४४.९९ अंकासह सुरत तिसऱ्या क्रमांकावर, ३३६.९ अंकासह भोपाळ चौथ्या क्रमांकावर तर ३११.६५ अंकासह राची पाचव्या क्रमांकावर आहे. त्रिपुरा सहावा, विशाखापट्टणम सातव्या, वडोदरा आठव्या, वेल्लोर नवव्या, अमरावती दहाव्या, पुणे अकराव्या, कानपूर बाराव्या नंबरवर आहे.स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात पुढे असलेले इंदोर शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत १५ व्या क्रमांकावर आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेले वाराणसी १४ व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड १९ व्या आणि नाशिक २३ व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते व गृहनिर्माण आदींसाठी नंबर दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते.नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसएससीडीसीएल) च्या देखरेखीखाली शहरात प्रकल्पाचे काम सुरु आहे.सोशियो-इकोनॉमिक सर्वे सुरु आहेपूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात आणला जात आहे. यात पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडीतील १७३० एकरचा विकास करण्यात येईल. संबंधित प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून रस्ते व प्रभावित होणाऱ्या संपत्तींचे मार्किंग पूर्ण करण्यात आलेले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२०० संपत्ती काही प्रमाणात तुटतील. तर ५०० संपत्ती पूर्णपणे तुटणार आहेत. संबंधित प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. सध्या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्यांचे अध्ययन करण्यासाठी सोशियो-इकोनॉमिक सर्वे केला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू होईल.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीnagpurनागपूर