शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपातील स्मार्ट कार्ड घोटाळा १२़ ५४ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:11 IST

महापालिकेच्या परिवहन विभागातील स्मार्ट तिकीट कार्ड घोटाळा दोन महिन्यापूर्वी उघडकीस आला होता़ या प्रकरणी तब्बल ३५ तिकीट कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहे़ यात १२ लाख ५४ हजाराचा अपहार झाल्याचा अहवाल महापालिकेने सीताबर्डी पोलिसांकडे सादर केला आहे़

ठळक मुद्दे३५ कंडक्टरवर आरोप निश्चित : मनपाने पाठविला १५८ पानांचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागातील स्मार्ट तिकीट कार्ड घोटाळा दोन महिन्यापूर्वी उघडकीस आला होता़ या प्रकरणी तब्बल ३५ तिकीट कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहे़ यात १२ लाख ५४ हजाराचा अपहार झाल्याचा अहवाल महापालिकेने सीताबर्डी पोलिसांकडे सादर केला आहे़शहर बसने प्रवास करताना चिल्लर पैशावरून अनेकदा प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद होतात. या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. शिवाय प्रत्येक प्रवाशाला सुटे पैसे देणेही शक्य नाही. कंडक्टर आणि प्रवासी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी कॅशलेस कार्डचा पर्याय स्वीकारण्यात आला़ महापालिके च्या परिवहन विभागाने एटीएमप्रमाणे स्मार्ट तिकीट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.१०० रुपयांपासून तर २००० रुपयांपर्यंतच्या स्मार्ट कार्डचा समावेश आहे. प्रवास करताना कार्डधारकाला प्रवाही स्मार्ट कार्ड कंडक्टरकडे असलेल्या मशीनमधून स्वाईप करावे लागते. त्यानंतर मिळणारी पावती हेच तिकीट समजले जाते. त्याची नोंद सर्व्हरमध्ये होते. मात्र काही कंडक्टर प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेऊन स्वत:जवळ असलेले कार्ड स्वाईप करून पावती प्रवाशांना देत होते. त्यांच्याजवळ असलेली मशीन कुठल्याही सर्व्हरला जोडली नव्हती. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले होते. ६३ बोगस स्वाईप मशीन असल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारावर यादी तयार करण्यात आली होती़ यातील ३५ कंडक्टरला निलंबित करण्यात आले़१५८ पानांचा अहवालस्मार्ट कार्ड घोटाळ्यात ३५ कंडक्टरना निलंबित करण्यात आले़ त्यांच्यावर आरोप निश्चिती झाली असून पोलीस तपास करीत आहे़ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असे पत्र आम्ही पोलिसांना दिले आहे़ अधिकारी, कर्मचारी यांचे बयाण नोंदविण्यात आले असून महापालिकेने १५८ पानांचा अहवाल सीताबर्डी पोलिसांकडे सादर केला आहे़शिवाजी जगतापपरिवहन व्यवस्थापक महापालिका

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार