शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:39 AM

जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानात एक पाऊल पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातूनही शहरातील स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. निवडक वॉर्डात स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, यशस्वी झाल्यास तो राज्यातील नगर पालिकांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.केंद्र शासनाने २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यात राज्यातील नगर पालिका हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार मोहपा पालिकेने त्यात सहभाग नोंदवीत प्रथम क्रमांक पटकावला. मोहपा ही नगर परिषद जिल्ह्यातील जुन्या १० नगर परिषदांपैकी सर्वात लहान ‘क’ वर्ग नगर परिषद आहे. मात्र तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही नगर परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. नागरिकांच्या समस्या नोंदविण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम टोल फ्री क्रमांक देणाऱ्या या नगर परिषदेने शहराच्या स्वच्छतेसाठी आता अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

आॅनलाईन राहणार ‘वॉच’स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने कचरा संकलनासाठी स्वत:चे अ‍ॅप विकसित केले आहे. शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक युनिक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. कार्डच्या मागे क्यूआर कोड असणार आहे. प्रत्येक कुटुंबाने दररोज त्यांच्याकडील ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून कचरागाडीत टाकल्यानंतर कचरा संकलक त्याच्याकडील मोबाईलद्वारे कार्डचा क्यूआर कोड स्कॅन करेल. लगेच कचरा संकलनाची माहिती सर्व्हरवर अपलोड होईल. कोणत्या कुटुंबाकडून कचरा संकलित केला, केव्हा केला याची डिजिटल स्वरूपात नोंद होणार आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामातील हयगय, टाळाटाळ, नागरिकांच्या तक्रारी याला आळा बसणार आहे. कचरागाडी सध्या कोठे आहे, संकलनाच्या दैनिक, आठवडी, मासिक अहवालासोबतच कचरागाडीत कचरा न टाकता इतरत्र टाकणारे ओळखता येणार आहे. या प्रणालीवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ‘आॅनलाईन वॉच’ राहणार आहे.

नागरिकांचे सहकार्य गरजेचेसध्या वॉर्ड क्र. १, १० आणि १२ साठी या प्रणालीचा वापर करण्यास नगर पालिकेने सुरुवात केली आहे. यात नगराध्यक्ष, पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यानेच शहर स्वच्छ राहील.- हरिश्चंद्र टाकरखेडे,मुख्याधिकारी, न.प. मोहपा.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान