शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शेअर बाजारात छोटे गुंतवणूकदार परत येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:31 IST

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारात पुन्हा परत येतील, असा विश्वास मुंबई येथील नामांकित सीए केतन वजानी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसीए केतन वजानी : ‘जीतो’ नागपूरतर्फे अर्थसंकल्पावर कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारात पुन्हा परत येतील, असा विश्वास मुंबई येथील नामांकित सीए केतन वजानी यांनी व्यक्त केला.जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन, नागपूरतर्फे (जीतो) अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन चिटणवीस सेंटरमध्ये मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी आयकरातील तरतुदींवर वजानी बोलत होते. व्यासपीठावर पुणे येथील सीए जयदीप मर्चंट, ‘जीतो’ नागपूरचे उपाध्यक्ष नितीन खारा, सचिव प्रतीक सरावगी, वित्त समितीचे चेअरमन व कार्यक्रमाचे समन्वयक सीए जुल्फेश शाह, बिझनेस व लॉ समितीचे चेअरमन अश्विन शाह उपस्थित होते.वजानी म्हणाले, सरकारच्या घोषणांमुळे गुंतवणूकदार भयभीत आहेत. बाजाराचा कल पाहूनच व्यवहार करणे उचित राहील. व्यापारी-उद्योजक आणि लोकांना अपेक्षित बजेट सरकारने मांडला नाही, अशी ओरड आहे. सरकारने सुरक्षा व्यवहार कर (एसटीटी) न हटविता दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के कराची तरतूद केली. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करणाºयांना दुहेरी कर भरावा लागेल. ही तरतूद १ एप्रिल २०१८ पासून आहे. हा कर कशा पद्धतीने भरावा, यावर त्यांनी व्हिडिओ सादरीकरणाद्वारे माहिती दिली.अप्रत्यक्ष करावर माहिती देताना सीए जयदीप मर्चंट म्हणाले, विदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यामुळे ही स्थिती ओढावली. घरगुती कंपन्यांनी खरेदी केल्यास बाजार स्थिर राहील. घरगुती गुंतवणूकदारांनी वर्ष २०१७ मध्ये शेअर बाजारात दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यावर्षीही केल्यास बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येतील. बाजारात पूर्वीप्रमाणेच उत्साह दिसून येईल.जुल्फेश शाह म्हणाले, अर्थसंकल्पात १ आॅगस्ट २०१४ नंतर लाँग टर्म कॅपिटल गेनवर कराची तरतूद केली आहे. सध्याच्या दुहेरी कर प्रणालीमुळे लहान गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. याद्वारे सरकारकडे ३० हजार कोटी कर गोळा होणार आहे. याशिवाय इक्विटी व म्युच्युअल फंडाच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारला आहे. आयकरात ५५ सुधारणा केल्या आहेत. त्याचा परिणाम करदात्यांवर होणार आहे.प्रास्ताविक नितीन खारा यांनी केले तर शाह यांनी संचालन व आभार मानले. यावेळी जीतो नागपूरचे उपाध्यक्ष रजय सुराणा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Stock Marketशेअर बाजारnagpurनागपूर