शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

छोट्या छोट्या बदलांमुळे घर होऊ शकते सुंदर

By admin | Updated: June 13, 2017 02:11 IST

आपल्या घराला सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक महिला परिश्रम घेते. प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की आपले घर अधिकाधिक आकर्षक असायला हवे,...

घर सुंदर बनविण्याच्या गृहिणींनी जाणून घेतल्या टीप्स : रिन व लोकमत सखी मंचचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या घराला सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक महिला परिश्रम घेते. प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की आपले घर अधिकाधिक आकर्षक असायला हवे, परंतु घर नेहमी कसे सुंदर बनवून ठेवावे, याला धरून अनेकांच्या मनात संभ्रम असतो. गृहिणींच्या याच संभ्रमाला दूर करण्यासाठी रिन आणि लोकमत सखी मंचच्या वतीने ‘सुंदर माझे घर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर बिपासा पाटील यांनी सखींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जेव्हा आपण घराला सजविण्यासाठी काही खरेदी करतो, तेव्हा जुन्या वस्तू घरातून काढायला हव्यात. अनेकदा जुन्या वस्तूंमध्ये लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. परंतु आपल्या मनाला समजावून हे करायलाच हवे,नाहीतर घराची सुंदरता खराब करणाऱ्या वस्तूंचा घरातच ढीग लागतो. घराची पहिली खोली ही मोठीच असायला हवी. परंतु अनेक घरांची पहिली खोली छोटी असते. जर ही खोली छोटी वाटत असेल तर त्या खोलीमध्ये मोठा आरसा लावावा. यामुळे ही खोली मोठी दिसेल. याच पद्धतीने विविध रंगाचा वापर केल्याने वेगवेगळा प्रभाव पडतो. प्रमुख पाहुणे म्हणून रिनच्यावतीने एचयूएलचे संचालक आदित्य गोखले, एचयूएलचे एक्झिकेटीव्ह जितेंद्र तिजारे, टेंडरनेस्ट किंडरगार्टनच्या संचालक आसावरी कुलकर्णी आणि प्रिजेनच्या संचालक विनी मेश्राम उपस्थित होत्या. ‘पाणी वाचवा’ ही शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदित्य गोखले यांनी, रिनमुळे घराघरांतील पाणी कसे वाचविल्या जाऊ शकते याची माहिती दिली. दरम्यान पाणी वाचविण्याच्या आधारावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. रिन प्रस्तुत ‘वन मिनिट गेम शो’चे संचालन अमोल शेंडे यांनी केले. यात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. संचालन नेहा जोशी यांनी केले.किशोरी शहाणे व बॉबीने साधला संवादकार्यक्रमाचे आकर्षण हिंदी-मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचा मुलगा अभिनेता बॉबी हा होता. या दोघांनी सखींसोबत संवाद साधला. सखींनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. या दरम्यान सखींच्या आग्रहावरून काही गाण्यांवर नृत्यही सादर केले.स्पर्धेतील विजेतेपोस्टर आणि स्लोगन : प्रथम क्रमांक दीपिका भगत, द्वितीय क्रमांक अक्षरा भिडे, तृतीय क्रमांक स्नेहल लोंडे, चतुर्थ क्रमांक अनुष्का जगनाडे.लेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक अर्चना शिरदाते, द्वितीय क्रमांक सुमिता पाटील तर तृतीय क्रमांक वसुधा गुढे.