शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

... हे आहे नागपूर जिल्ह्यातील लघु पशु चिकित्सालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:58 IST

शासनाच्या विविध विभागांच्या टोलेजंग इमारती एकीकडे बघावयास मिळतात, तर दुसरीकडे लघु पशु चिकित्सालयांच्या पडक्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळासह जनावरांची आबाळ

विजय नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या टोलेजंग इमारती एकीकडे बघावयास मिळतात, तर दुसरीकडे लघु पशु चिकित्सालयांच्या पडक्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे गोवंश वाचविण्याची भाषा करीत असलेल्या शासनाच्या काळात गुरांच्या उपचाराची आबाळ होत आहे. याचे वैषम्य कुणालाही वाटत नाही. या दवाखान्याची एखादी इमारत कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला या इमारतींच्या जीर्णोद्धारासाठी जाग येईल काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.कळमेश्वर तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे तालुक्यात आजमितीस ५,५९७ संकरित गाई, १,७९१ संकरित बैल व गोºहे, १३,४९१ देशीगाई, १४,७९९ देशीबैल, ५,८७८ म्हशी, २५,९७४ शेळ्या व १,४६३ मेंढ्या आहेत. शिवाय, कोंबड्या व पाळीव कुत्र्यांची संख्याही बरीच मोठी आहे. या प्राण्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी कळमेश्वर येथे तालुका लघु पशु चिकित्सालय व ग्रामीण भागात नऊ दवाखान्यांची निर्मिती करण्यात आली.या सर्व दवाखान्यांचा प्रशासकीय कारभार व पशुच्या वैद्यकीय सेवेची जबाबदारी तालुकास्तरावरील पशु चिकित्सालयाकडे सोपविण्यात आली. या दवाखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आली.दवाखान्याची इमारत सिमेंट काँक्रिटची असली तरी छताचे पापुद्रे पडायला सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने कौलारू असून, त्यांचीही दुरवस्था झाली आहे. वास्तवात या इमारतींचे नव्याने बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. इमारत बांधकामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वच्छतागृहांची अवस्थाही दिव्यअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दवाखान्याच्या परिसरात स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली. मात्र, ते वापरण्यायोग्य नसल्याने अधिकारी व कर्मचारी रोज पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाचा वापर करतात. पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने पावसाळ्यात चिकित्सालयाच्या आवाराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. एकीकडे, डासांना पोषक वातावरण मिळत असून, दुसरीकडे परिसरात दुर्गंधी पसरते. अनुकूल वातावरणामुळे या परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे. सध्या या पशु चिकित्सालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणा गवत व झुडपे वाढलेली आहेत.

टॅग्स :Governmentसरकार